सिन्नर : करोना विषाणू संसर्ग प्रादुर्भाव रोखण्यासाठी करावयाच्या उपययोजनांतर्गत सोमवारी सिन्नर शहरात भरणारा भाजीपाला बाजार गर्दी टाळण्यासाठी बंद करण्यात आला. हा बाजार आता कृषी उत्पन्न बाजार समिती यार्ड, संजीवनी नगर आणि आडवा फाटा भागातील वंजारी समाज मैदान या तीन ठिकाणी विभागून भरवण्यात येणार आहे. या कारवाईवेळी नगराध्यक्ष किरण डहाळे, तहसीलदार राहुल कोताडे, नगरपरिषद मुख्याधिकारी संजय केदार, पोलिस निरीक्षक साहेबराव पाटील आदी उपस्थित होते.
सिन्नरचा भाजीबाजार हटवला
करोना विषाणू संसर्ग प्रादुर्भाव रोखण्यासाठी करावयाच्या उपययोजनांतर्गत सोमवारी सिन्नर शहरात भरणारा भाजीपाला बाजार गर्दी टाळण्यासाठी बंद करण्यात आला...
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 25 Mar 2020, 4:00 am