अ‍ॅपशहर

सरकत्या जिन्याची सुविधा लवकरच

नाशिकरोड स्थानकात सरकते जिने लवकरच कार्यान्वित केले जातील, असे आश्वासन नाशिकरोड रेल्वे स्थानकाची पाहणी केल्यानंतर रेल्वे बोर्डाच्या प्रवासी सुविधा समितीने दिल्याने त्याबाबत प्रवाशांच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत.

Maharashtra Times 14 Sep 2017, 4:00 am
म. टा. वृत्तसेवा, नाशिकरोड
महाराष्ट्र टाइम्स.कॉम sliding grips feature soon at nashik road railway station
सरकत्या जिन्याची सुविधा लवकरच

नाशिकरोड स्थानकात सरकते जिने लवकरच कार्यान्वित केले जातील, असे आश्वासन नाशिकरोड रेल्वे स्थानकाची पाहणी केल्यानंतर रेल्वे बोर्डाच्या प्रवासी सुविधा समितीने दिल्याने त्याबाबत प्रवाशांच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत.

अहमदाबाद-नाशिक रेल्वे सेवा सुरू करण्याचा तसेच दादर-शिर्डी ओखा गाडी दिल्लीपर्यंत नेण्याचा प्रस्ताव असल्याचे समितीने सांगितले. चौथ्या प्लॅटफॉर्मवर गाड्यांची संख्या वाढविण्याची सूचना समितीने केली आहे. रेल्वे प्रवाशांना

देण्यात येणाऱ्या सुविधांची पाहणी करण्यासाठी समिती मुंबईहून मंगळवारी, पाहणीला आल्यानंतर त्यांनी ही आश्वासने दिली. नाशिकरोड स्थानकात अनेक दिवसांच्या मागणीनंतर लिफ्ट सुरू झाली आहे. त्याचवेळी सरकते जिने बसविले जातील, असे सांगण्यात आले होते. मात्र, अद्याप त्याबाबतची कोणतीही कारवाई झालेली नाही.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज