नाशिकरोड : बोधलेनगरसमोरील ड्रीम सिटी-टाकळी रस्त्यावरील नाला उघडा असल्याने त्यातून प्रचंड दुर्गंधी येत आहे. रहिवाशांबरोबरच वाहन चालकही त्रस्त झाले आहेत. हा नाला बंदिस्त करण्याची मागणी होत आहे. फेम सिनेमागृहाच्या चौकातून टाकळीकडे रस्ता जातो. या चौकापासून हा नाला सुरू होतो. तो ड्रीम सिटीच्या पुढे अनेक मीटर अंतरापर्यंत आहे. नाल्यात कचरा, प्लास्टिक, घाण पाणी आदी सोडण्यात आल्याने प्रचंड दुर्गंधी कायम पसरलेली असते.
नाल्यामुळे दुर्गंधी
बोधलेनगरसमोरील ड्रीम सिटी-टाकळी रस्त्यावरील नाला उघडा असल्याने त्यातून प्रचंड दुर्गंधी येत आहे रहिवाशांबरोबरच वाहन चालकही त्रस्त झाले आहेत...
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 21 Nov 2019, 4:00 am