अ‍ॅपशहर

मोकाट गायींचा हल्ला, महिला जखमी

पाटील गार्डन येथे पाच ते सहा मोकाट गायींनी एका महिलेवर हल्ला केला. या हल्ल्यात सदर महिला गंभीर जखमी झाली असून तिच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मनपा आरोग्य विभागाचे डॉक्टर प्रमोद सोनावणे यांनी गायींच्या वाढत्या प्रादूर्भावाची नगरसेविका दीपाली कुलकर्णी यांच्याकडे तक्रार केली असून कारवाईची मागणी केली आहे.

महाराष्ट्र टाइम्स.कॉम 19 Apr 2018, 12:26 pm
नाशिक: पाटील गार्डन येथे पाच ते सहा मोकाट गायींनी एका महिलेवर हल्ला केला. या हल्ल्यात सदर महिला गंभीर जखमी झाली असून तिच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम stray cow attacks on women in nashik
मोकाट गायींचा हल्ला, महिला जखमी


नाशिकच्या पाटील गार्डन जवळील निरंजन पार्क मर्चंट बँकेसमोर हा प्रकार घडला. मर्चंट बँकेसमोरून जात असताना शोभा जोशी या महिलेवर समोरून आलेल्या पाच-सहा मोकाट गायींनी जोरदार हल्ला चढवला. त्यामुळे त्या रक्तबंबाळ झाल्या. शोभा जोशी यांच्यावर गायींनी हल्ला सुरू केल्याचं लक्षात आल्यानंतर प्रवीण खरात, अजय खरात, कल्पेश सोनावणे आणि राहुल विंचूरकर या चौघांनी जीव धोक्यात घालून शोभा यांचे प्राण वाचवले. त्यानंतर त्यांना पालिकेच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. मनपा आरोग्य विभागाचे डॉक्टर प्रमोद सोनावणे यांनी गायींच्या वाढत्या प्रादूर्भावाची नगरसेविका दीपाली कुलकर्णी यांच्याकडे तक्रार केली असून कारवाईची मागणी केली आहे. कलानगरमध्ये राहणारे चव्हाण यांच्या मालकीच्या या गायी असल्याचं सांगण्यात येतं.


बँकेसमोरून जात असताना आधी मला एका वासराने जोरात धडक दिली. त्यामुळे मी पडले आणि सावरून उठण्याचा प्रयत्न केला. पण तेवढ्यात पाच ते सहा गायी माझ्या अंगावर धावून आल्या आणि त्यांनी मला शिंगाने मारण्यास सुरुवात केली. त्यामुळे मी जोरजोरात ओरडण्यास सुरुवात केली. त्यामुळे चार मुलांनी येऊन या गायींच्या हल्ल्यातून त्यांनी माझी सुटका केली.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज