अ‍ॅपशहर

तिघा संशयितांना पोलिस कोठडी

सुरगाणा या आदिवासी तालुक्यातील जवळपास सहा कोटीचा रेशन धान्य घोटाळा २०१५ मध्ये उघडकीस आला होता. या घोटाळ्यास जबाबदार असलेल्या अधिकारी व अनेक दुकानदारांवर फौजदारी गुन्हे दाखल झाले होते. या प्रकरणातील तीन संशयितांना मंगळवारी (दि. २१) अटक झाली. त्यांना दिंडोरी कोर्टाने २ डिसेंबरपर्यंतची पोलिस कोठडी सुनावली आहे.

Maharashtra Times 23 Nov 2017, 4:20 am
म. टा. वृत्तसेवा, कळवण
महाराष्ट्र टाइम्स.कॉम suragana curruption
तिघा संशयितांना पोलिस कोठडी

सुरगाणा या आदिवासी तालुक्यातील जवळपास सहा कोटीचा रेशन धान्य घोटाळा २०१५ मध्ये उघडकीस आला होता. या घोटाळ्यास जबाबदार असलेल्या अधिकारी व अनेक दुकानदारांवर फौजदारी गुन्हे दाखल झाले होते. या प्रकरणातील तीन संशयितांना मंगळवारी (दि. २१) अटक झाली. त्यांना दिंडोरी कोर्टाने २ डिसेंबरपर्यंतची पोलिस कोठडी सुनावली आहे.
उगम पगारिया, मोरारजी भिकुलाल मंत्री व संजय रामकृष्ण गडाख अशी अटक करण्यात आलेल्या तिघा संशयितांची नावे आहेत. तपास अधिकारी तथा कळवणचे पोलिस उपअधीक्षक देविदास पाटील यांनी मंगळवारी (दि. २१) अटक केली. सुरगाणा तालुक्यातील रेशनचा गहू, तांदूळ व साखर हा माल नाशिक येथील शासकीय गोडावूनमधून ने-आण करण्याची जबाबदारी या घोटाळ्यातील आरोपी गडाख व मंत्री या दोघांची होती. त्यानुसार सरकारने त्यांच्याशी करारही केलेला होता. त्यानुसार सुरगाणा शासकीय गोडावूनपर्यंत माल पोचवण्याची जबाबदारी या दोघांची होती; मात्र त्यांनी काही माल पोहोचवला तर काही पोहोचवला नाही. हा रेशनिंग घोटाळा संगनमताने झाल्याचा संशय असल्याने वरिष्ठ अधिकारी वर्गापासून अनेकांवर याबाबत सुरगाणा पोलिस स्टेशनमध्ये गुन्हे दाखल करण्यात आले होते. त्यानुसार वरील तिघांना ताब्यात घेण्यात आले. दिंडोरी कोर्टात हजर केले असता त्यांना २ डिसेंबरपर्यंत पोलिस कोठडी मिळाली आहे. याबाबत निःपक्षपातीपणे तपास होऊन आणखी जबाबदार घोटाळेबाज अधिकारी, व्यापारी यांच्यावरही लवकरच कारवाई करण्यात यावी, अशी मागणी होत आहे. पुढील तपास उपअधीक्षक देविदास पाटील करीत आहेत.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज