अ‍ॅपशहर

जीवघेण्या खड्ड्याकडे नगरपंचायतीचे दुर्लक्ष

सुरगाणा शहरात पोलिस ठाण्याच्या भिंतीलगत जीवघेणा खड्डा आहे. मात्र याकडे नगराध्यक्ष व नगरसेवकांकडून पूर्णपणे दुर्लक्ष झालेले दिसून येत आहे. नेमका हा खड्डा शहर पोलिस ठाण्याच्या लगत असणाऱ्या सार्वजनिक स्वच्छतागृहाचा आहे. त्यामुळे या खड्ड्यात पडून अथवा अपघात होऊ शकतो, अशी भीती निर्माण झाली आहे.

Maharashtra Times 26 Jun 2016, 4:00 am
सुरगाणा पोलिस ठाण्याजवळील परिस्थिती
महाराष्ट्र टाइम्स.कॉम surgana city road issue
जीवघेण्या खड्ड्याकडे नगरपंचायतीचे दुर्लक्ष

म. टा. वृत्तसेवा, कळवण

सुरगाणा शहरात पोलिस ठाण्याच्या भिंतीलगत जीवघेणा खड्डा आहे. मात्र याकडे नगराध्यक्ष व नगरसेवकांकडून पूर्णपणे दुर्लक्ष झालेले दिसून येत आहे. नेमका हा खड्डा शहर पोलिस ठाण्याच्या लगत असणाऱ्या सार्वजनिक स्वच्छतागृहाचा आहे. त्यामुळे या खड्ड्यात पडून अथवा अपघात होऊ शकतो, अशी भीती निर्माण झाली आहे.

यापूर्वी जिल्हा परिषदेच्या सार्वजनिक बांधकाम विभागाने अनेकदा याठिकाणी स्लॅब टाकून टाकी दुरूस्त केली होती. मात्र टाकीचे काम फक्त बिले काढण्यापुरतेच केले गेले. स्वच्छतागृहाची टाकीवर कोणत्याही प्रकारचे झाकण ठेवलेले नसल्याने पावसाळ्यात पाणी भरल्यास यामध्ये लहान मुले, वृद्ध माणसे पडल्यावर हकनाक जीव गमवावा लागेल. तसेच यामध्ये स्वच्छतागृहाचे पाणी येत असल्याने पोलिस ठाण्यात अधिकारी, कर्मचाऱ्यांना, नागरिकांना दूर्गंधीस सामना करावा लागत आहे. तरी या उघड्या टाकीवर तत्काळ स्लॅब अथवा झाकण टाकावे पावसाळ्यात याच मार्गाने शाळेत विद्यार्थी ये-जा करतात. एखाद्याचा जीव धोक्यात गेल्यास त्याला जबाबदार कोण, असा प्रश्न नागरिक करीत आहेत.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज