अ‍ॅपशहर

मांडूळ साप तस्करांना अटक

म टा...

Maharashtra Times 23 Sep 2018, 4:00 am

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

पैशांचा पाऊस पाडण्यासाठी सुमारे २५ लाखांच्या मांडूळ जातीच्या सापाची तस्करी करणाऱ्या दोन जणांना गुन्हे शाखा युनिट एकच्या पथकाने शुक्रवारी अटक केली. यापूर्वी याच पथकाने द्वारका येथून एक टोळी पकडली होती. काही दिवसांपासून मांडूळ सापाच्या तस्करीच्या घटना वाढल्या आहेत.

सोमनाथ नथू चारोस्कर (वय २२, रा. पिंपळगाव खांब, तालुका नाशिक) आणि अजय कैलास मोरे (१९, रा. गाडे वस्ती, चेहेडी जकात नाका) अशी अटक करण्यात आलेल्या संशयितांची नावे आहेत. गुन्हे शाखा युनिट एकचे पोलिस शिपाई स्वप्नील जुंद्रे यांना गुप्त बातमीदारामार्फत दोन व्यक्ती गांडूळ जातीच्या सापाची तस्करी करीत असून, ते विक्रीसाठी शहरात येणार असल्याची खात्रीशीर माहिती मिळाली होती. वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलिस निरिक्षक आनंदा वाघ, सहाय्यक पोलिस निरीक्षक महेश कुलकर्णी, पोलिस कर्मचारी बलराम पालकर, पोट कारवाळ, बाळासाहेब दोंदे, रवींद्र बागूल, वसंत पांडव, संजय मुळक, येवाजी महाले, तसेच वन विभागाचे परिमंडळ अधिकारी रवींद्र सोनावर व रवींद्र भोगे यांच्यासह व्ही. एन. नाईक शाळेजवळ सापळा लावला होता. संशयित टप्प्यात येताच त्यांना पकडण्यात आले. त्यांची झडती घतली असता कापडी पिशवीत २५ लाख १५ हजार किमतीचा मांडूळ जातीचा साप आढळून आला.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज