देवळाली कॅम्प : येथील डॉ. गुजर सुभाष हायस्कूलच्या नववीच्या विद्यार्थ्यांनी राज्यस्तरीय कुडो स्पर्धेत सहभागी होत सुवर्णपदक पटकावले. नुकत्याच बुलढाणा येथे राज्यस्तरीय कुडो क्रीडा स्पर्धा पार पडल्या. या स्पर्धेत डॉ. गुजर शाळेच्या नीलम शिंदे हिची राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड करण्यात आली आहे. स्वागता दिघे या विद्यार्थिनीने द्वितीय क्रमांक पटकावला. या स्पर्धेत साक्षी सावंत, अनन्या मिश्रा, दीक्षा गायकवाड, साहिल जाधव, सुमरीन मोहरीर, मान्यता यादव यांनी सहभाग नोंदवला.
नीलमची निवड
येथील डॉ गुजर सुभाष हायस्कूलच्या नववीच्या विद्यार्थ्यांनी राज्यस्तरीय कुडो स्पर्धेत सहभागी होत सुवर्णपदक पटकावले...
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 20 Nov 2019, 4:00 am