सिन्नर : सिन्नर-ठाणगाव बसच्या मागील चाकाखाली सापडून वयोवृद्ध महिला ठार झाल्याची घटना सोमवारी दुपारी दोनच्या सुमारास घडली. सिन्नर ठाणगावकडे जाणारी बस (एमएच १२ इएफ ६६३२) डुबेरे गावात प्रवाशांना उतरून पुढे निघाली असता काशीबाई रेवजी साळवे (वय ८०) ही वयोवृद्ध महिला बसच्या चाकाखाली सापडल्याने तिचा जागीच मृत्यू झाला. पुढील तपास सिन्नर पोलिस करीत आहेत.
बसखाली सापडून वृद्धा ठार
सिन्नर-ठाणगाव बसच्या मागील चाकाखाली सापडून वयोवृद्ध महिला ठार झाल्याची घटना सोमवारी दुपारी दोनच्या सुमारास घडली...
Maharashtra Times 3 Jul 2018, 4:00 am