येवला : तालुक्यातील जळगाव नेऊर ते मुखेड रस्त्यावर गुरुवारी दुपारी झालेल्या अपघातात सत्यगाव येथील बाळकृष्ण शांताराम दराडे (वय ३६) या शिक्षकाच्या पोटावरून ट्रक गेल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. हा ट्रक वाळूवाहतूक करणारा असल्याची चर्चा आहे. ही घटना गुरुवारी दुपारी एक ते दोनच्या सुमारास घडली असून, दराडे प्लॅटिना दुचाकीवर होते. दराडे उमराणे येथील श्री छत्रपती शिवाजी मराठा हायस्कूलमध्ये शिक्षक होते. त्यांच्या मागे पत्नी, मुलगा, मुलगी असा परिवार आहे.
ट्रकने चिरडले शिक्षकाला
तालुक्यातील जळगाव नेऊर ते मुखेड रस्त्यावर गुरुवारी दुपारी झालेल्या अपघातात सत्यगाव येथील बाळकृष्ण शांताराम दराडे (वय ३६) या शिक्षकाच्या पोटावरून ...
Maharashtra Times 27 Apr 2018, 5:00 am