सातपूर : मदर इंडस्ट्री असलेल्या महिंद्रा अॅण्ड महिंद्रा कंपनीत कामगार भरती असल्याचे सोशल मीडियावर व्हायरल करण्यात आले आहे. मात्र, कंपनीत कुठलीही भरती नसल्याचे व्यवस्थापनाने जाहीर केले आहे. सोशल मीडियावर व्हायरल केला जात असलेला मेसेज चुकीचा असून, त्यावर विश्वास ठेवू नये, असे आवाहनही कंपनी व्यवस्थापनाकडून करण्यात आले आहे. यापूर्वीही व्यवस्थापनाकडून कंपनीत कुठलीही भरती नसल्याचे जाहीर करण्यात आले होते.
महिंद्रा कंपनीत कुठलीही भरती नाही
मदर इंडस्ट्री असलेल्या महिंद्रा अॅण्ड महिंद्रा कंपनीत कामगार भरती असल्याचे सोशल मीडियावर व्हायरल करण्यात आले आहे...
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 17 May 2020, 4:00 am