म्हसरूळच्या शिवमंदिरात उपक्रम
...
म. टा. वृत्तसेवा, पंचवटी
दिंडोरी रोड म्हसरूळ येथील शिवमंदिरात छत्रपती शिवाजी महाराज जन्मोत्सवानिमित्ताने आज (दि. १८) रात्री १२ वाजता ३९० मशाली पेटविण्यात येणार आहेत. शिवजयंतीनिमित्ताने दिंडोरी रोड, म्हसरूळ शिवजन्मोत्सव समितीच्या वतीने दोन दिवस विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
दिंडोरी रोड म्हसरूळ येथील शिवाजी महाराजांच्या मंदिराची आणि मंदिर परिसराची स्वच्छता करण्यात आली आहे. मंदिरावर आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. यंदा ३९० वा शिवजन्मोत्सव असल्याने या दिवशी ३९० रक्तदाते रक्तदान करणार आहेत. आज (दि. १८) रात्री मशाली पेटवून, फटाक्यांची आतषबाजी करण्यात येणार आहे. बुधवारी (दि. १९) सकाळी नऊ वाजता शिवमंदिरात शिवराज्याभिषेक करण्यात येणार आहे. मंदिरात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मूर्तीवर दुग्धाभिषेक करण्यात येणार आहे. या कार्यक्रमास उपस्थित राहण्याचे आवाहन हर्षल पवार, तुषार भोसले, सचिन कदम, गणेश पेलमहाले, हार्दिक निगळ, राकेश मोराडे आदींसह दिंडोरी रोड, म्हसरूळ शिवजन्मोत्सव समितीच्या सदस्यांनी केले आहे.