नाशिक : इयत्ता अकरावीच्या प्रवेश प्रक्रियेसाठी इंदिरानगरमधील गुरू गोविंदसिंह कॉलेजमधील ऑडेटोरियम हॉलमध्ये गुरुवारी (दि. १४) मुख्याध्यापकांसाठी कार्यशाळा होणार आहे. सकाळी १० वाजता सुरू होणाऱ्या या कार्यशाळेला प्रवेश प्रक्रियेत सहभागी झालेल्या सर्व कॉलेजेसच्या मुख्याध्यापक किंवा प्राचार्यांनी उपस्थिती बंधनकारक आहे. यात संबंधितांना प्रवेश प्रक्रियेविषयी सूचना देण्यात येणार असल्याची माहिती शिक्षण उपसंचालक रामचंद्र जाधव यांनी दिली आहे. दरम्यान, या प्रवेश प्रक्रियेंतर्गत २३ हजार ७८८ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे.
आज मुख्याध्यापक कार्यशाळा
इयत्ता अकरावीच्या प्रवेश प्रक्रियेसाठी इंदिरानगरमधील गुरू गोविंदसिंह कॉलेजमधील ऑडेटोरियम हॉलमध्ये गुरुवारी (दि...
Maharashtra Times 14 Jun 2018, 4:00 am