अ‍ॅपशहर

टोमॅटोही घसरला

ढासळत्या उन्हाळ ‘कांदा’ बाजारभावाने एकीकडे उत्पादक शेतकऱ्यांचा यंदा ‘वांधा’ केला असतानाच गेल्या काही महिन्यात टोमॅटोच्या बाजारभावाचा आलेखदेखील कमालीचा खाली आला आहे. गतवर्षी श्रमाचे चांगले दाम हाती टेकवणारा टोमॅटो तरी यंदा साथ देईल, असे वाटत असताना त्यानेही निराशा केल्याने बळीराजाचा चेहरा काळवंडला आहे.

Maharashtra Times 27 Sep 2016, 4:00 am
शेतकऱ्यांचे शुक्लकाष्ठ संपेना; ५० रुपये क्रेट दर
महाराष्ट्र टाइम्स.कॉम tomato rates issue
टोमॅटोही घसरला


म. टा. वृत्तसेवा, येवला

ढासळत्या उन्हाळ ‘कांदा’ बाजारभावाने एकीकडे उत्पादक शेतकऱ्यांचा यंदा ‘वांधा’ केला असतानाच गेल्या काही महिन्यात टोमॅटोच्या बाजारभावाचा आलेखदेखील कमालीचा खाली आला आहे. गतवर्षी श्रमाचे चांगले दाम हाती टेकवणारा टोमॅटो तरी यंदा साथ देईल, असे वाटत असताना त्यानेही निराशा केल्याने बळीराजाचा चेहरा काळवंडला आहे.


येवला कृषी उत्पन्न बाजार समितीच्या येवला मुख्य बाजार आवार तसेच अंदरसूल उपबाजार आवारात नुकत्याच संपलेल्या सप्ताहात उन्हाळ कांद्याची आवक टिकून होती. मात्र बाजारभावात कमालीची घसरण झाल्याचे चित्र दिसले. उन्हाळ कांद्याला येथे सरासरी ३०० रुपये प्रतिक्विंटल असा बाजारभाव मिळाला. टोमॅटोच्या भावात देखील मोठी पडझड होत प्रती क्रेटमागे अवघे ५० रुपये हाती पडल्याने शेतकऱ्यांची घोर निराशा झाली. सध्या मिळणारा बाजारभाव बघता उत्पादन खर्चाच्या मानाने हाती ५० टक्के रक्कम देखील पडत नसल्याने बळीराजा हवालदिल झाला आहे. येवला मुख्य आवारात गेल्या सप्ताहात एकुण २३ हजार ७५२ क्विंटल इतकी कांदा आवक होताना उन्हाळ कांद्याचे बाजारभाव किमान १०० ते कमाल ५७० रुपये (सरासरी ३००) प्रतिक्विंटल असा होता. अंदरसूल उपबाजारात एकूण ८ हजार ८५७ क्विंटल कांदा आवक होताना याठिकाणी देखील किमान, कमाल व सरासरी बाजारभावाची स्थिती येवला मुख्य बाजार आवरासारखीच होती.

येवला कृषी उत्पन्न बाजार समितीच्या येवला मुख्य मार्केट यार्डवर गेल्या सप्ताहात टोमॅटोच्या आवकेत वाढ झाली. मात्र बाजारभावात प्रचंड घसरण झाल्याचे दिसून आले. सप्ताहात एकुण १ लाख ८ हजार क्रेट आवक झाली. तर बाजारभाव किमान ३० ते कमाल १४१ (सरासरी ५०) रुपये प्रती क्रेट प्रमाणे होते. सप्ताहात टोमॅटोला देशांतर्गत जोधपूर, इंदुर, जयपूर, भोपाळ आदी ठिकाणी सर्वसाधारण मागणी होती.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज