अ‍ॅपशहर

‘अमृतधाम’वर वाहतूक कोंडी

मुंबई-आग्रा महामार्गावरील अमृतधाम चौफुली तसेच हनुमान नगर चौफुलीवर वाहतूक कोंडीची समस्या गंभीर झालेला आहे. या चौफुलीवर असलेल्या वाहतूक शाखेच्या पोलिसांचे वाहतूक सुरळीत करण्याकडे होत असलेले दुर्लक्ष कारणीभूत ठरत असल्याचे स्थानिक नागरिकांची तक्रार आहे.

Maharashtra Times 25 Feb 2018, 2:43 pm
म. टा. वृत्तसेवा, पंचवटी
महाराष्ट्र टाइम्स.कॉम traffic collision on amrutdham
‘अमृतधाम’वर वाहतूक कोंडी


मुंबई-आग्रा महामार्गावरील अमृतधाम चौफुली तसेच हनुमान नगर चौफुलीवर वाहतूक कोंडीची समस्या गंभीर झालेला आहे. या चौफुलीवर असलेल्या वाहतूक शाखेच्या पोलिसांचे वाहतूक सुरळीत करण्याकडे होत असलेले दुर्लक्ष कारणीभूत ठरत असल्याचे स्थानिक नागरिकांची तक्रार आहे. रात्रीच्यावेळी होणारी वाहतूक कोंडी प्रवाशांच्या दृष्टीने डोकेदुखी ठरत आहे.

महामार्गाला अमृतधाम येथे विडीकामगार नगरकडून येणारा तसेच हिरावाडीकडून येणारा रस्ता मिळतो. या मार्गाने येणाऱ्या वाहनांची संख्याही वाढलेली आहे. रस्ता क्रॉसिंग करताना या चौफुलीवर होत असताना महामार्गावर वाहनांच्या रांगा लागतात. हीच परिस्थिती हनुमान नगर चौफुलीवर निर्माण होते. रासबिहारी मार्गाने दिंडोरी रोडवरून येणारी वाहने आणि हनुमाननगरकडून येणारी वाहने या चौफुलीवर क्रॉस होतात. लग्नतिथीच्या काळात तर वाहनांची संख्या दुप्पटी-तिप्पटीने वाढते. त्यावेळी तासनतास वाहतूक खोळंबते.

प्रत्येक वाहनचालकांना लवकर पोहचण्याची घाई झालेली असते. त्यामुळे मिळेल तेथून आपले वाहन पुढे काढण्याच्या प्रयत्नात आणखी कोंडी होत असते. रस्त्यावर पोलिस कर्मचारी नसल्यास हे प्रकार जास्त घडतात. त्यामुळे पोलिसांची या चौफुलीवर वाहतूक सुरळीत ठेवण्याचा प्रयत्न ठेवल्यास अशा प्रकारची कोंडी होणार नाही, असे स्थानिक नागरिकांचे म्हणणे आहे.

जीव मुठीत धरून प्रवास

महामार्गावर उड्डानपूलामुळे वाहतुकीची समस्या सोडविण्यास मदत झाली असली तरी महामार्गाच्या चौफुलीवर समस्या वाढल्या आहेत. शहर परिसराच्या ज्या भागात चौफुल्या आहेत. त्या भागातील वाहतुकीच्या नियंत्रणासाठी उपाययोजना पाहिजे तशा झाल्या नाहीत. महामार्गाने जाणाऱ्या अवजड वाहतूक करणारी वाहने आणि शहर परिसरातून क्रॉसिंग करणारे वाहने यांची वाढती संख्या यांचा विचार करता चौफुलीवर वाहतुकीचे नियोजन योग्य पद्धतीने व्हायला हवे तसे होत नसल्यामुळे ही समस्या वाढली आहे. पादचाऱ्यांना महामार्ग ओलांडायचा असेल तर त्यांनाही चौफुलीच्या भागाचाच वापर करावा लागतो. महामार्गात इतर भागातून पायी जाऊन रस्ता ओलांडणे शक्य होत नाही. त्यामुळे चौफुल्यांवर वाहनांबरोबरच पादचाऱ्यांची कोंडी होते.

कोट..

अमृतधाम चौफुलीवर वाहतुकीची कोंडी नित्याची असून, शुक्रवारी (दि. २३) रोजी रात्री साडेनऊपासून अशीच कोंडी झाली होती. त्यावेळी वाहतूक शाखेचे पोलिस कर्मचारी नसल्यामुळे ही कोंडी सोडविणे मुश्किल झाले होते. बळी महाराज मित्रमंडळाच्या कार्यकर्त्यांनी पुढाकार घेऊन वाहतूक सुरळीत केली.

-सूनील सूर्यवंशी, स्थानिक नागरिक

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज