अ‍ॅपशहर

मेगा ब्लॉकमुळे 'या' रेल्वेगाड्या रद्द

​​भुसावळ विभागात भुसावळ, भादली, जळगाव या रेल्वेस्थानकांदरम्यान पाच तासांचा मेगा ब्लॉक असल्यामुळे काही रेल्वेगाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. कोल्हापूर-गोंदिया महाराष्ट्र एक्सप्रेस डाऊन ही कोल्हापूरवरुन ७ जुलैला सुटणारी गाडी भुसावळला ८ जुलैला रद्द झाली आहे

Maharashtra Times 7 Jul 2018, 5:31 am
जेलरोड :
महाराष्ट्र टाइम्स.कॉम trains canceled due to mega block
मेगा ब्लॉकमुळे 'या' रेल्वेगाड्या रद्द

भुसावळ विभागात भुसावळ, भादली, जळगाव या रेल्वेस्थानकांदरम्यान पाच तासांचा मेगा ब्लॉक असल्यामुळे काही रेल्वेगाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. कोल्हापूर-गोंदिया महाराष्ट्र एक्सप्रेस डाऊन ही कोल्हापूरवरुन ७ जुलैला सुटणारी गाडी भुसावळला ८ जुलैला रद्द झाली आहे. गोंदियावरून ९ जुलैला सुटणारी हीच गाडी भुसावळला ९ जुलैला रद्द असल्याची माहिती रेल्वेने पत्रकाद्वारे दिली आहे. सुरतवरून ७ जुलैला सुटणारी सुरत-भुसावळ पॅसेंजर ही गाडी ८ जुलैला जळगाव स्टेशनपर्यंतच धावेल. दरम्यान, रेल्वेचा पूल कोसळणे, पाऊस, नवा पूल बांधणे, रुळ बदलणे आदी कारणांमुळे रेल्वेगाड्या रद्द करण्यात येत आहेत.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज