अ‍ॅपशहर

हुंड्यासाठी पत्नीला ठार मारण्याचा प्रयत्न

हुंड्यासाठी विवाहितेचा वेळोवेळी शारीरिक, मानसिक छळ करून तिचा गळा दाबून मारण्याचा प्रयत्न केला. भांडण सुरू असताना मुलगा रडत होता म्हणून त्याला गॅलरीतून फेकण्याचा प्रयत्न पतीने केल्याची खळबळजनक घटना घडली.

महाराष्ट्र टाइम्स 23 Aug 2020, 3:31 pm
नाशिकरोड : हुंड्यासाठी विवाहितेचा वेळोवेळी शारीरिक, मानसिक छळ करून तिचा गळा दाबून मारण्याचा प्रयत्न केला. भांडण सुरू असताना मुलगा रडत होता म्हणून त्याला गॅलरीतून फेकण्याचा प्रयत्न पतीने केल्याची खळबळजनक घटना घडली. विवाहितेने पती व सासरच्याविरोधात उपनगर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम हुंड्यासाठी पत्नीला ठार मारण्याचा प्रयत्न


जय भवानीरोड येथील लोणकर मळा येथे राहणाऱ्या विवाहितेने तिचा पती सुधाकर दिवे व इतर तिघांविरुद्ध तक्रार दाखल केली आहे. विवाहितेच्या तक्रारीनुसार पोलिसांनी सर्व जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

कर्ज फेडण्यासाठी माहेरून सात लाख रुपये आणले नाही, विवाहितेच्या घरच्यांनी लग्नात मानपान दिला नाही तसेच लग्नात सोन्याचे दागिने कमी दिले या कारणास्तव या विवाहितेचा सासरच्यांकडून छळ केला जात होता असे तक्रारीत म्हटले आहे.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज