नाशिक : जाहिरात प्रसारीत करणाऱ्या एका मोबाइल अॅप्लिकेशनमध्ये शहरातील दोघा युवकांचे फोटोग्राफ्स, मोबाइल क्रमांक व अश्लिल मजकूर टाकून ही जाहिरात काढून टाकण्यासाठी पैसे उकळण्याचा प्रयत्न करणाऱ्या अज्ञात व्यक्तीविरुद्ध सायबर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. अमृतधाम, पंचवटी भागात राहणाऱ्या २८ वर्षांच्या युवकाने या प्रकरणी तक्रार दिली. लोकॅन्टो (locanto) नावाचे छोट्या जाहिराती प्रसिद्ध करण्याचे एक मोबाइल अॅप्लिकेशन आहे. यात वर्गवारीनुसार ग्राहक आपल्या जाहिराती प्रसिद्ध करू शकतात. मात्र, या ऑनलाइन अॅप्लिकेशनमध्ये अश्लिल संदेशासह जाहिरातींची देवघेव होत असते. याच अॅप्लिकेशनमध्ये फिर्यादी युवकासह अन्य एका व्यक्तीचा फोटो, नाव आणि मोबाइल क्रमांक टाकून प्रसिद्ध करण्यात आला होता.
पैसे उकळण्याचा प्रयत्न
जाहिरात प्रसारीत करणाऱ्या एका मोबाइल अॅप्लिकेशनमध्ये शहरातील दोघा युवकांचे फोटोग्राफ्स, मोबाइल क्रमांक व अश्लिल मजकूर टाकून ही जाहिरात काढून ...
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 29 Sep 2019, 4:00 am