अ‍ॅपशहर

महामार्गावरील दुकाने जळून खाक

आडगाव परिसरातील मुंबई-आग्रा महामार्गावरील सर्व्हिस रोड येथील गुरुनानक पेट्रोल पंपाशेजारील टायर व किराणा दुकाला अचानक आग लागल्याने दोन दुकाने जाळून खाक झाली.

Maharashtra Times 24 May 2017, 3:25 am
म. टा. वृत्तसेवा, आडगाव
महाराष्ट्र टाइम्स.कॉम two shop fired
महामार्गावरील दुकाने जळून खाक


आडगाव परिसरातील मुंबई-आग्रा महामार्गावरील सर्व्हिस रोड येथील गुरुनानक पेट्रोल पंपाशेजारील टायर व किराणा दुकाला अचानक आग लागल्याने दोन दुकाने जाळून खाक झाली. आगीत कोणतीही जीवितहानी हानी झाली नाही. दरम्यान, आगीचे नेमके कारण समजू शकले नाही.

मुंबई महामार्गावरील सर्व्हिस रोडवर ज्ञानेश्वर लभडे यांच्या किराणा दुकानासह जॉन बेनी यांचे टायर पंचरचे दुकान आहे. सोमवारी रात्री साडेबारा वाजेच्या सुमारास टायर दुकानाला आग लागल्याचे परिसरातील नागरिकांच्या लक्षात आले. त्यांनी अग्निशामक दलाला तत्काळ कळविले. दुकानांतील जुने आणि नवीन टायर तत्काळ पेटले. या आगीत टायर आणि किराणा दुकान जळून खाक झाले. अग्निशामन दलाच्या जवानांनी आग विझविली. आगीत शेजारी सिद्धू का ढाबा या हॉटेलचे किरकोळ नुकसान झाले.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज