अ‍ॅपशहर

वाहनचोरी प्रकरणी दोन संशयितांना अटक

मटा प्रतिनिधी, नाशिक जिल्हा सरकारी रुग्णालयातून दुचाकी चोरणाऱ्या दोन अल्पवयीन संशयितांना सरकारवाडा पोलिसांनी अटक केली आहे...

Maharashtra Times 18 Jul 2018, 4:00 am

म.टा. प्रतिनिधी, नाशिक

जिल्हा सरकारी रुग्णालयातून दुचाकी चोरणाऱ्या दोन अल्पवयीन संशयितांना सरकारवाडा पोलिसांनी अटक केली आहे. त्यांच्याकडून चोरीच्या तीन दुचाकी जप्त करण्यात पोलिसांना यश आले आहे.

शीतल सुमीत आरक (रा. अंबड लिंकरोड) यांची दुचाकी जिल्हा रुग्णालयाच्या वाहनतळातून चोरीस गेली होती. त्यांनी १३ जुलै रोजी सरकारवाडा पोलिस स्टेशनमध्ये फिर्याद दिली होती. वाहने चोरणाऱ्या संशयितांची माहिती पोलिसांना खबऱ्यांच्या माध्यमातून मिळाली. या संशयितांना ताब्यात घेण्यात आले. त्यांच्याकडून एक लाख १० हजार रुपयांच्या तीन दुचाकी हस्तगत करण्यात आल्या.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज