ज्येष्ठ नागरिक
संघाची स्थापना
नाशिक : विंरगुळा ज्येष्ठ नागरिक संघाची स्थापना करण्यात आली आहे. लोकज्योती ज्येष्ठ नागरिक संघातर्फे पाइपलाइन रोड येथे विरंगुळा ज्येष्ठ नागरिक संघाची स्थापना केली. या संघाच्या अध्यक्षपदी साहेबराव मौले यांची निवड झाली आहे. स्थापना कार्यक्रमात अस्थिविकार तज्ज्ञ डॉ. अरूण खरे यांनी ज्येष्ठ नागरिकांना सांधीवात आजाराबाबत मार्गदर्शन केले.
सौरभ सोनवणे अध्यक्षपदी
नाशिक : महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या शहराध्यक्षपदी सौरभ सोनवणे यांची निवड करण्यात आली. मनविसेचे अध्यक्ष आदित्य शिरोडकर यांनी सौरभ यांना नियुक्ती पत्र दिले आहे. मनविसेच्या माध्यमातून कॉलेजात विद्यार्थ्यांना भेडसावणाऱ्या समस्यांचे निराकरण केले जाईल, असे मत सौरभ यांनी व्यक्त केले आहे. यावेळी मनविसेचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते.
पालक शिक्षक संघाची स्थापना
नाशिक : मखमलाबाद येथील छत्रपती शिवाजी विद्यालयात पालक शिक्षक संघ स्थापन करण्यात आला आहे. विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढावी. तसेच विद्यालयाचे कामकाज पालकांना माहिती व्हावे. विद्यार्थ्यांच्या अभ्यासाकडे पालकांचे आणि शिक्षकांचे लक्ष राहावे, या हेतूने या संघाची स्थापना केल्याचे मुख्यध्यापक के. एस. गवले यांनी सांगितले आहे. संघाचे उपाध्यक्ष म्हणून भास्कर थोरात यांची निवड करण्यात आली आहे.
वृक्षसंवर्धनासाठी वृक्षबंधन
नाशिक : हरित नाशिक सुंदर नाशिक संकल्पनेअंतर्गत जनशक्ती फाउंडेशनतर्फे वृक्षबंधन उपक्रम राबविण्यात आला. रक्षाबंधनाचे औचित्य साधत रविवारी वृक्ष संवर्धनासाठी वृक्षांना राखी बांधण्यात आली. गोल्फ क्लब मैदानात हा कार्यक्रम संपन्न झाला. यावेळी नगरसेविका अॅड. वैशाली भोसले, नगरसेवक शाहू खैरे, अॅड. दिलीप राठी, अॅड. मनोज भोसले, जॉगर्स क्लबचे विनय बिरारी, जनशक्तीचे कार्यकर्ते संदिप आहेर, सोमनाथ मेढे यांसह इतर पदाधिकारी उपस्थित होते.