अ‍ॅपशहर

होय ही शिवसेनाच आहे, माझ्या वडिलांनी स्थापन केली, मिंधेंच्या वडिलांनी नाही; ठाकरेंचा शिंदेंवर हल्लाबोल

Uddhav Thackeray : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी नाशिकमधील मालेगाव येथील विराट सभेच मुख्यमत्री एकनाथ शिंदे, भाजप आणि केंद्रीय निवडणूक आयोगावर निशाणा साधला.

Authored byसुनील तांबे | महाराष्ट्र टाइम्स.कॉम 26 Mar 2023, 8:37 pm
मालेगाव : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मालेगावच्या सभेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर हल्लाबोल केला. गद्दारांच्या हातात भगवा शोभत नाही असे सांगतानाच होय, ही शिवसेनाच आहे... मी शिवसेनाच म्हणते, माझ्या वडिलांनी स्थापन केलेली ही शिवसेना आहे, मिंधेंच्या वडिलांनी नाही, असा शब्दांत ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर निशाणा साधला. यावेळी ठाकरे यांनी शेतकरीपुत्र म्हणवणाऱ्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्वत:च्या शेतात दोन-दोन हॅलिपॅड बांधून शेतकऱ्यांच्या समस्यांकडे दुर्लक्ष करत आहेत, अशा शब्दात मुख्यमंत्री शिंदे यांना टोला लगावला आहे.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम uddhav thackeray criticizes cm eknath shinde
ठाकरेंचा शिंदेवर हल्लाबोल


मालेगावच्या सभेत मुख्यमंत्री शिंदे यांच्यावर ताशेरे ओढताना ठाकरे म्हणाले की, ज्यांच्या गळ्यात दोरी बांधून घंटा बाधलेली आहे ते काय समस्या सोडवणार...हे शेतकऱ्यांचे पुत्र आहेत असे म्हणतात. आपले मुख्यमंत्री हेलिकॉप्टरने शेतात जातात. यांच्या शेतात दोन-दोन हेलिपॅड आहेत. दुसरीकडे शेतकरी कर्जात डुंबले आहेत, त्यांच्या बांधावर जायला त्यांच्याकडे वेळ नाही. अवकाळी पाऊस मुख्यमंत्र्यांना आणि कृषी मंत्र्यांना दिसला नाही. माझा शेतकरी रात्री अपरात्री शेतात जातो त्यावेळी त्यांना साप चावतात,विंचू चावतात. शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढल्या आहेत. हे होत असतं असं हे लोक बोलायचं असतं की जाऊन शेतकऱ्यांचे अश्रू पुसायचे असतात.

जसं मला सांभाळलं तसं उद्धवला व आदित्यला सांभाळा; ठाकरे गटाकडून मालेगावात भावनिक आवाहन
'हे खोक्यात घातलेले मिंधे आहेत'

एकनाथ शिंदे आणि त्यांच्यासोबत गेलेल्या आमदारांवर टीकास्त्र सोडताना ठाकरे म्हणाले की, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी मिंधे गटाला ४८ जागा देणार असे म्हणाले. तुमच्या नावाच ५२ आहे, तर मिंधे गटाला ५ जागा तरी द्या. हे तुमच्या खोक्यात घुसलेले मिंधे आहेत, अशा शब्दांत उद्धव ठाकरे यांनी टीकेचे प्रहार केले.

साहेबांनी शब्द पाळला; लाडक्या वसंतसाठी राज ठाकरे पुण्यात, अखेर पूर्ण केली इच्छा
भाजपला दिले आव्हान

तुम्ही म्हणजे भाजप मिंधेच्या नेतृत्वात निवडणुका लढणार का हे भाजपने जाहीर करावे, असे आवाहन ठाकरे यांनी भाजपला केले आहे. जर भाजपला असं वाटत असेल की शिवसेना ही ठाकरेंपासून तोडू, मात्र तुमचे ५२ काय, पण १५२ कुळं खाली उतरली तरी ठाकरेंपासून शिवसेना तोडू शकत नाही. हिम्मत असेल तर तातडीने निवडणुका घ्या, मी माझ्या वडिलांच्या नावाने मतं मागतो मग कोण जिंकतंय ते बघू, असे ठाकरे म्हणाले.
लेखकाबद्दल
सुनील तांबे
सुनील तांबे हे महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये प्रिन्सिपल कंटेट प्रोड्युसर म्हणून कार्यरत आहेत. त्यांनी सी न्यूज, ईटीव्ही मराठी वृत्तवाहिनी या वाहिन्यांमध्ये प्रतिनीधी आणि वरिष्ठ प्रतिनिधी म्हणून काम पाहिले आहे, तसेच मुंबई सकाळ या वृत्तपत्रात मंत्रालय प्रतिनिधी म्हणून काम पाहिले आहे. त्याच प्रमाणे आयबीएन लोकमत या वृत्तवाहिनीत असोसिएट एडिटर म्हणून आणि मी मराठी या वृत्त वाहिनीत असोसिएट एडिटर म्हणून काम पाहिले आहे. तसेच त्यांनी युवर स्टोरी या डिजिटल मीडियात वरिष्ठ कंटेट प्रोड्युसर म्हणूनही काम पाहिले आहे. सुनील तांबे हे २०१५ पासून महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये आजतागायत कार्यरत आहेत. सुनील तांबे यांना इलेक्ट्रॉनिक, प्रिंट आणि डिजिटल मीडियात गेल्या २३ वर्षांपासून कार्यरत आहेत.... आणखी वाचा

महत्वाचे लेख