नाशिक : सहजयोग परिवाराच्या वतीने २१ ते २३ जूनदरम्यान सप्तशृंगगडावर श्री आदिशक्ती पूजा महोत्सव होणार आहे. २१ जून रोजी सकाळी ९ वाजता स्वागत व नोंदणी, सकाळी ११ वाजता जागतिक योगदिन कार्यक्रम, दुपारी ३ वाजता सप्तशृंगी देवीदर्शन व रात्री ८ वाजता सहज संगीत कार्यक्रम होणार आहे. २२ जून रोजी सकाळी ९ ते दुपारी १२ प्रचार-प्रसार, दुपारी ४ ते सायंकाळी ७ विश्वशांती हवन, सायंकाळी ७ ते रात्री ८ सांस्कृतिक कार्यक्रम व रात्री ९ नंतर भजनसंध्या हे कार्यक्रम होतील. २३ जून रोजी सकाळी १० वाजता पालखी सोहळा, सकाळी ११ वाजता आदिशक्ती पूजा व दुपारी ३ वाजता महाप्रसाद याप्रमाणे कार्यक्रम होणार आहेत.
वणीत २१ जूनपासून आदिशक्ती पूजा
सहजयोग परिवाराच्या वतीने २१ ते २३ जूनदरम्यान सप्तशृंगगडावर श्री आदिशक्ती पूजा महोत्सव होणार आहे...
MT 19 May 2019, 4:00 am