अ‍ॅपशहर

भाज्यांची आवक वाढली

जिल्ह्यात परतीच्या पावसाने जोर धरलेला असताना भाजीपाल्याची आवक प्रचंड वाढली आहे. भिजलेल्या भाजीपाल्याची टिकण्याची क्षमता कमी झाल्यामुळे असा भाजीपाला खराब होत असल्यामुळे अशा भाजीपाला खरेदी करण्यास व्यापारी धजावत नाहीत.

Maharashtra Times 12 Oct 2017, 4:00 am
सततच्या पावसामुळे होतेय नासाडी; दरांमध्ये घसरण
महाराष्ट्र टाइम्स.कॉम vegetables inward increases in nashik
भाज्यांची आवक वाढली


म. टा. वृत्तसेवा, पंचवटी

जिल्ह्यात परतीच्या पावसाने जोर धरलेला असताना भाजीपाल्याची आवक प्रचंड वाढली आहे. भिजलेल्या भाजीपाल्याची टिकण्याची क्षमता कमी झाल्यामुळे असा भाजीपाला खराब होत असल्यामुळे अशा भाजीपाला खरेदी करण्यास व्यापारी धजावत नाहीत. त्यामुळे सध्या सिमला मिरची आणि वांगी वगळता सर्वच भाजीपाल्याचे दर घसरले आहेत.

यंदा भाजीपाल्याची लागवड वाढलेली असल्यामुळे ऐन दिवाळीत भाजीपाल्याचे पिक मोठ्या प्रमाणात निघू लागले आहे. त्यातच पावसामुळे पिके खराब होण्याची भीती लक्षात घेऊन तयार भाजीपाला काढणीवर भर देण्यात येत आहे. पावसामुळे भाजीपाल्याची काढणीचे काम कठीण झाले असले तरी मोठ्या मुश्किलीने त्याची काढणी करून तो बाजार विक्रीसाठी आणला जात आहे. बाजारात मात्र, त्याचे दर खाली घसरले आहे.

बाजारात विक्रीस आलेला भाजीपाला हा ओला असल्यामुळे असा ओला भाजीपाला जास्त काळ टिकण्याची शक्यता कमी होते. तो परपेठेच्या प्रवासात कुजतो. तो टिकत नसल्यामुळे व्यापारी खरेदी करीत नाहीत. पालेभाज्या खराब होण्याचे प्रमाण जास्त आहे. ओला भाजीपाला पॅक केल्यानंतर ट्रकमध्ये भरला जातो. अशा परिस्थिती तो खराब होण्याची शक्यता लक्षात घेऊन लांबच्या बाजारात पाठविण्यासाठी कोरड्या मालाची मागणी असते, असा कोरडा माल मिळणे मुश्किल असल्यामुळे भाजीपाल्याचे दरात घसरण होत आहे.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज