अ‍ॅपशहर

भाजीपाल्याची आवक घटली

रात्रीपासून सुरू असलेल्या पावसामुळे नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीत येणाऱ्या भाजीपाल्याची आवक शुक्रवारी दुपारी लिलावाच्या वेळी घटली. मात्र, मुंबई आणि उपनगरात सुरू असलेल्या जोरदार पावसामुळे भाजीपाल्याची मागणी कमी झाली.

Maharashtra Times 15 Jul 2017, 3:38 am
म. टा. वृत्तसेवा, पंचवटी
महाराष्ट्र टाइम्स.कॉम vegitable market
भाजीपाल्याची आवक घटली


रात्रीपासून सुरू असलेल्या पावसामुळे नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीत येणाऱ्या भाजीपाल्याची आवक शुक्रवारी दुपारी लिलावाच्या वेळी घटली. मात्र, मुंबई आणि उपनगरात सुरू असलेल्या जोरदार पावसामुळे भाजीपाल्याची मागणी कमी झाली. परिणामी गुरुवारच्या (दि. १३) तुलनेत भाजीपाल्याच्या भावात घसरण झाली.

पहाटेच्या किरकोळ विक्रीच्या बाजारासाठी गुरुवारी काढण्यात आलेला शेतमाल आला असल्याने त्यावेळची आवक बऱ्या प्रमाणात होते. दुपारी लिलावासाठी शेतातून सकाळी भाजीपाला काढून आणण्यात येतो. मात्र, रात्रीपासून पाऊस सुरू असल्याने शेतकऱ्यांना भाजीपाल्याची काढणी करणेच शक्य झाले नाही. परिणामी भाजीपाल्याची आवक प्रचंड घटली. आवक कमी असली तरी ज्या भागात भाजीपाला पाठवायचा त्या भागातही जोरदार पाऊस असल्यामुळे व्यापाऱ्यांनी जास्त प्रमाणात भाजीपाल्याची खरेदी केली नसल्याने गुरुवारच्या तुलनेत शुक्रवारी दरात घसरणच झाली.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज