सातपूरला वाहने जप्त
सातपूर : सातपूर भागात पहाटेपासूनच वाहने रस्त्यांवर धावतांना दिसली. पोलिस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांच्या आदेशावरून पोलिसांनी विनाकारण भटकंती करणाऱ्यांना हटकले आणि घरी जाण्यास सांगितले. काही हौशी दुचाकीचालकांनी पळून जाण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी मात्र त्यांना चोप देत त्यांची वाहने जप्त केली. पोलिसांनी पपया नर्सरी, अशोकनगर रोड, कार्बन नाका, महिंद्रा सर्कल, सातपूर पोलिस स्टेशन आदी ठिकाणी बॅरिकेड्स उभी करीत दुचाकी चालकांना घरी परतण्याचा सल्ला दिला.