नाशिक : महाराष्ट्र कामगार क्रांती संघटनेच्या पुढाकारातून अंबड येथील जेमिनी इंस्ट्राटेक लिमिटेड कंपनीत ८ हजार ५०० रूपयांचा वेतनवाढ करार करण्यात आला असून, गेल्या चार वर्षांच्या वेतनातही हा वाढीव फरक देण्यात येणार आहे. हा करार संघटनेचे अध्यक्ष रम्मी राजपूत, कंपनीचे व्यवस्थापक महेंद्र जैन, विलास बिरारी, संघटनेचे सरचिटणीस इमरान पठाण, नगरसेवक राकेश दोंदे, युनियनचे प्रतिनिधी संजय कोल्हे, सुदाम पावडे, अतुल पाटील, सुनील भदाणे, संजय सावकार यांच्या उपस्थितीत करण्यात आला.
वेतनवाढ करार
महाराष्ट्र कामगार क्रांती संघटनेच्या पुढाकारातून अंबड येथील जेमिनी इंस्ट्राटेक लिमिटेड कंपनीत ८ हजार ५०० रूपयांचा वेतनवाढ करार करण्यात आला असून, ...
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 31 Dec 2019, 4:00 am