अ‍ॅपशहर

रस्त्यावरच्या धुळीवर पाण्याची मात्रा; कॅन्टोन्मेंट बोर्ड अधिकाऱ्यांकडून अजब उपाय

नाशिक महानगरपालिकेप्रमाणे रस्त्यावर नियमित झाडू मारला जावा जेणेकडून ही माती रस्त्याचा कडेला न थांबता ती उचलण्यात येईल. याबाबत कॅन्टोन्मेंट प्रशासनाकडे चौकशी केली असता मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राहुल गजभिये यांच्या सांगण्यावरून पाणी रस्त्यावर टाकले जात असल्याचे समजले.

Edited byम. टा. प्रतिनिधी | महाराष्ट्र टाइम्स 14 Oct 2022, 2:02 pm
देवळाली कॅम्प : देवळाली कॅन्टोन्मेंट भागातील लामरोडसह सर्वच रस्त्यांची पावसामुळे वाताहत झाली असल्याने या रस्त्यांवरून प्रवास करताना नागरिकांना धुळीचा सामना करावा लागत होता. यावर उपाय म्हणून कॅन्टोन्मेंट प्रशासनाकडून रस्त्यावर पाण्याच्या टँकरच्या माध्यमातून पाणी मारण्याची अजब कृती केली जात आहे. ‘रोगापेक्षा इलाज भयंकर’ अशाप्रकारे रस्त्यावर पाणी टाकण्याच्या या कृतीने नागरिकांमध्ये चर्चा रंगली आहे.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम deolali news
रस्त्यावरच्या धुळीवर पाण्याची मात्रा; कॅन्टोन्मेंट बोर्ड अधिकाऱ्यांकडून अजब उपाय


पावसाने विश्रांती घेतल्यानंतर पडलेल्या उन्हामुळे रस्त्यावरील चिखलाचे रूपांतर पुन्हा मातीत होताना मोठ्या प्रमाणावर धूलिकण तयार होत आहेत. परिणामी, रस्त्यावरून ये-जा करणाऱ्या वाहनचालकांना या धूलिकणांचा त्रास होत असल्याचे लक्षात येताच प्रशासनाकडून ही धूळ उठू नये म्हणून पाण्याच्या टँकरने पाणी मारण्याचा अजब प्रकार केला जात आहे. मात्र, थोड्याच वेळात सततची वर्दळ व उन्हाने त्या पाण्याचे बाष्पीभवन होत असल्याने त्याचा फारसा फायदा होत नाही. त्याऐवजी नाशिक महानगरपालिकेप्रमाणे रस्त्यावर नियमित झाडू मारला जावा जेणेकडून ही माती रस्त्याचा कडेला न थांबता ती उचलण्यात येईल. याबाबत कॅन्टोन्मेंट प्रशासनाकडे चौकशी केली असता मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राहुल गजभिये यांच्या सांगण्यावरून पाणी रस्त्यावर टाकले जात असल्याचे समजले.

महत्वाचे लेख