अ‍ॅपशहर

अभ्यास केला ‘गेल’चा; पेपर आला ‘सिमन्स’चा

वेस्ट इंडिजने उपांत्यफेरीत भारताला पराभूत केले आणि अंतिम फेरीत जाण्याचे भारतीय क्रिकेट टिमसह संपूर्ण क्रिकेट रसिकांचे स्वप्न भंगले. ही हार क्रिकेटप्रेमींच्या मनाला चटका लावून गेली. विश्वचषक जिंकण्याचे स्वप्न क्षणात भंगले आणि मनातले हे गहिरे दुःख व्यक्त करण्याचा मिश्किल मरगळ चोखाळत अनेक कल्पकवीरांनी सोशल मीडियावरील भन्नाट मेसेजेसद्वारे आपल्या मनातील दुःखाला वाट करून दिली. •विश्व कप तेव्हाच जिंकलाय..

Maharashtra Times 2 Apr 2016, 4:00 am
म. टा. वृत्तसेवा, मनमाड
महाराष्ट्र टाइम्स.कॉम whats up jocks on match
अभ्यास केला ‘गेल’चा; पेपर आला ‘सिमन्स’चा

वेस्ट इंडिजने उपांत्यफेरीत भारताला पराभूत केले आणि अंतिम फेरीत जाण्याचे भारतीय क्रिकेट टिमसह संपूर्ण क्रिकेट रसिकांचे स्वप्न भंगले. ही हार क्रिकेटप्रेमींच्या मनाला चटका लावून गेली. विश्वचषक जिंकण्याचे स्वप्न क्षणात भंगले आणि मनातले हे गहिरे दुःख व्यक्त करण्याचा मिश्किल मरगळ चोखाळत अनेक कल्पकवीरांनी सोशल मीडियावरील भन्नाट मेसेजेसद्वारे आपल्या मनातील दुःखाला वाट करून दिली. •विश्व कप तेव्हाच जिंकलाय..

‘जेव्हा टीम इंडिया ने पाकिस्तानला हरवून त्यांना स्पर्धेतून घरी पाठवलं तेव्हाच आम्ही विश्वचषक जिंकला तेव्हा टेंशन घेऊ नका’ अशी पोस्ट टाकून दुःख हलके केले. •अर्धे जिंकलोच

‘इंडिजमध्ये ‘इंडि’ शब्द आहेतच तेव्हा आपण अर्धे जिंकलोच आहोत’, ही पोस्ट लक्ष वेधणारी आणि मनाची समजूत काढणारी ठरली.

n..पेपर सिमन्सचा

अभ्यास केला ‘गेल’चा आणि पेपर आला ‘सिमन्स’चा हा मिश्किल मेसेज ओठांवर हसू पेरून जातो. यावरून इंडिजच्या गेलच्या अफलातून फटकेबाजीचा क्रिकेट रसिकांनी भारतीयांनी किती धस्का घेतला होता हे सिद्ध होते.•दो गुना लगान

‘बरे झालो हरलो नाहीतर फायनलला इंग्लड आले असते आणि तीन गुना लगान द्यावा लागला असता’ हे गणित ही काहींनी मांडून पराभवाचे शल्य जरा हलके केले आहे.•नो बॉल..

आश्विन आणि पांड्याने टाकलेले ते दोन no ball खूप धक्का देऊन गेले म्हणून त्या॑ना ही सोशल मीडिया वर टारगेट करण्यात आले. ‘यांनी रामायण वाचले असते तर दोन दोन वेळा लक्ष्मण रेषा ओलांडली नसती’ हे शब्द हशा मिळवीत आहेत. ‘नो बॉल पे विकेट याने जैसे मायके जाती बीबी का फ्लाईट कॅन्सल’ असाही ताळमेळ काहींना घातला.

n..आणि लय भारी

क्रिकेट आणि पवार साहेब यांची नाते ग्रेटच आहे. म्हणून ‘नो बॉल लाइन पुढे सरकवणार-शरद पवार साहेबांचे आश्वासन’ ही पोस्ट लय भारी असल्याचे दिसते.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज