अ‍ॅपशहर

किल्ल्यावर ट्रेकिंग करताना अचानक दोन मित्र दरीत कोसळले; एकाचा जागीच मृत्यू

Nashik Tourist : दुर्घटनेत प्राण गमावलेल्या तरुणाचा मृतदेह बाहेर काढण्यात आला असून या प्रकरणी जायखेडा पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

Authored byटीम मटा ऑनलाइन | Edited byअक्षय शितोळे | महाराष्ट्र टाइम्स.कॉम 16 Jul 2022, 6:51 am
नाशिक : राज्यभरात सध्या पावसाची संततधार सुरू असल्याने निसर्गाचं सौंदर्य चांगलंच खुललं आहे. त्यामुळे पर्यनस्थळी नागरिक मोठ्या प्रमाणात गर्दी करत असल्याचं पाहायला मिळत आहे. मात्र अनेक पर्यटनस्थळांवर दुर्घटनांचं प्रमाणही वाढलं असून नाशिक जिल्ह्यातील बागलाण तालुक्यातही असाच एक प्रकार घडला आहे.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम nashik police n 2
नाशिकमध्ये पर्यटकाचा मृत्यू


शिवकालीन साल्हेर किल्ल्यावर मालेगाव येथील १२ मित्र पर्यटनासाठी गेले होते. किल्ल्यावर ट्रेकिंग करत असताना पाय घसरल्याने दोन तरुण दरीत कोसळले. या दुर्घटनेत भावेश अहिरे या तरुणाचा जागीच मृत्यू झाला तर मनीष मुठेकर हा तरुण जखमी झाला. यानंतर इतर तरुणांनी या घटनेची माहिती मालेगाव येथे दिली असता घटनास्थळी मुल्हेर आणि जायखेडा पोलिसांनी धाव घेतली.

काय सांगता! मुंबईत पाणी तुंबण्याची उरली फक्त ८० ठिकाणे; महापालिकेने केला दावा

मालेगाव येथील अप्पर पोलीस अधीक्षक चंद्रकांत खांडवी हेदेखील या मुलांना वाचवण्यासाठी मालेगावहून साल्हेर किल्ल्याजवळ आले. खांडवी यांनी किल्ल्यावर चढाई करून जखमी तरुणाला चक्क आपल्या पाठीवर बसवून खाली उतरले. दुसरीकडे दुर्घटनेत प्राण गमावलेल्या तरुणाचा मृतदेह बाहेर काढण्यात आला आहे. या प्रकरणी जायखेडा पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

महत्वाचे लेख