अ‍ॅपशहर

नमाड हळदी कुंकवातून सामाजिक संदेश

सध्या सगळीकडे हळदीकुंकवासाठी महिलांची एकच धावपळ सुरू आहे. घरी येणाऱ्या महिलांना वाणात काय द्यायचे यावर आठवडाभर खल करूनही काहींना सर्वोत्तम वस्तू सापडत नाही. सापडली तरी नेमकी तिच वस्तू शेजारच्या गृहिनीने आधीच वाटली असं कळत आणि महिलांचा हिरमोड होतो. यावर मनमाड येथील भाग्यश्री दराडे यांनी चौकटीच्या बाहेर विचार करून वाणात महिलांना सॅनिटरी नॅपिकन वाटले.

Maharashtra Times 23 Jan 2018, 4:00 am
म. टा. वृत्तसेवा, मनमाड
महाराष्ट्र टाइम्स.कॉम manmad


सध्या सगळीकडे हळदीकुंकवासाठी महिलांची एकच धावपळ सुरू आहे. घरी येणाऱ्या महिलांना वाणात काय द्यायचे यावर आठवडाभर खल करूनही काहींना सर्वोत्तम वस्तू सापडत नाही. सापडली तरी नेमकी तिच वस्तू शेजारच्या गृहिनीने आधीच वाटली असं कळत आणि महिलांचा हिरमोड होतो. यावर मनमाड येथील भाग्यश्री दराडे यांनी चौकटीच्या बाहेर विचार करून वाणात महिलांना सॅनिटरी नॅपिकन वाटले. त्यांनी वाटलेला हा आगळावेगळा वाण पाहून घरी आलेल्या महिलांनीही येत्या हळदीकुंकवात असे नपॅकिन वाटण्याचा निर्धार केला.

दराडे यांनी महिलांना वाण म्हणून नॅपकिन तर वाटलेच शिवाय मासिक पाळी दरम्यान स्त्रियांनी घ्यावयाची काळजी व पाळावयाची स्वच्छता याबाबत देखील त्यांनी आलेल्या महिलांना मार्गदर्शन केले. सॅनिटरी नॅपकिनची उपयुक्तता समजावून सांगितली. त्यांच्या या उपक्रमाचे आणि प्रबोधनाचे परिसरात स्वागत होत आहे. संक्रांतीच्या सणानिमित्त घरी हळदी कुंकू करून महिलांना वाण देण्याची प्रथा सर्वत्र आहे. वाण म्हणून विविध गृहोपयोगी वस्तू किंवा सौंदर्य प्रसाधनेही वाटले जातात. भाग्यश्री दराडे यांनी मोठ्या धाडसाने यंदा संक्रांतीचे वाण म्हणून सॅनिटरी नॅपकिन वाटण्याचा निर्णय घेतला. त्यांचे पती डॉ. भागवत दराडे यांनीही या कल्पनेला मूर्त स्वरूप दिले. सुरुवातीला सॅनिटरी नॅपकिन चे वाण घेताना काही महिलांना अवघडल्यासारखे झाले. पण त्यांना याबाबत समजावून सांगत दराडे यांनी प्रबोधन केले. नुसते वाण वाटले नाही तर त्यामागचा उद्देश देखील त्यांनी समजावून सांगितला.

उपक्रमाचे कौतुक

या उपक्रमाचे महिलांच्या 'आम्ही मनमाडकर' या सोशल मीडियावरही स्वागत झाले. ज्या विषयावर बोलणे महिला टाळतात, त्यावर दराडे यांनी मात करीत थेट सॅनिटरी

नॅपकिनचे वाण वाटले. त्यांच्या या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज