नाशिकरोड : ग्रामपंचायतीत नेमणूक केलेल्या संगणक परिचालकांचे पाच महिन्यांपासून वेतन थकल्याने त्यांनी कामबंद आंदोलन सुरू केले आहे. दरमहा सहा हजार रुपये मानधनावर त्यांची नेमणूक असून, एप्रिल २०१९ पासूनचे मानधन रखडले आहे. या आंदोलनामुळे ग्रामपंचायतीतील कामकाज ठप्प आहे. जिल्ह्यातील पंचायत समिती गटविकास अधिकाऱ्यांना संबंधित तालुका संगणक परिचालक संघटनेने मागण्यांचे निवेदन दिले.
संगणक परिचालकांचे कामबंद आंदोलन
ग्रामपंचायतीत नेमणूक केलेल्या संगणक परिचालकांचे पाच महिन्यांपासून वेतन थकल्याने त्यांनी कामबंद आंदोलन सुरू केले आहे...
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 26 Aug 2019, 4:00 am