अ‍ॅपशहर

अपघातात तरुण उद्योजकाचा मृत्यू

नाशिक-कळवण रस्त्यावर रणतळ परिसरात नाशिकहून दिंडोरीकडे येणाऱ्या कारचे टायर फुटून गाडी झाडावर धडकून झालेल्या अपघातात दिंडोरी येथील तरुण उद्योजक अजिंक्य संजय राजे (२९) यांचा मृत्यू झाला.

Maharashtra Times 18 Aug 2017, 4:22 am
दिंडोरी : नाशिक-कळवण रस्त्यावर रणतळ परिसरात नाशिकहून दिंडोरीकडे येणाऱ्या कारचे टायर फुटून गाडी झाडावर धडकून झालेल्या अपघातात दिंडोरी येथील तरुण उद्योजक अजिंक्य संजय राजे (२९) यांचा मृत्यू झाला.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम young industrialist dead in accident
अपघातात तरुण उद्योजकाचा मृत्यू

दिंडोरी येथील अजिंक्य राजे हे बुधवारी मध्यरात्री नाशिकहून दिंडोरीला स्कॉर्पिओ कारने (एमच १५ बीएक्स १५२०) येत असताना हॉटेल राजयोग जवळील उतारावर मागील टायर अचानक फुटल्याने झाडावर गाडी आदळली. यात अजिंक्य राजे हे गंभीर जखमी झाले. दिंडोरी पोलिसांच्या गस्त पथकाने त्यांना तातडीने दिंडोरी ग्रामीण रुग्णालयात नेले; मात्र तेथे उपचार सुरू असताना त्यांचा मृत्यू झाला. अपघाताचे वृत्त समजताच परिसरातील नागरिकांनी ग्रामीण रुग्णालयात धाव घेतली. अजिंक्य यांनी अल्पावधीत बांधकाम व्यवसायात जम बसविला होता. त्यांचे पश्चात आई, वडील, पत्नी व सात महिन्याचा मुलगा असा परिवार आहे. गुरुवारी दुपारी त्यांच्यावर दिंडोरी येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. श्री स्वामी समर्थ टॅक्सी युनियनचे अध्यक्ष संजय राजे यांचे ते पुत्र होते.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज