अ‍ॅपशहर

​वर्क फ्रॉम होम सुरु असतांना अचानक तरुणाने चौदाव्या मजल्यावरुन घेतली उडी; काय घडलं असं?

साहिल पुण्यात नोकरीला होता. नाशिकमधील राहत्या घरी ‘वर्क फ्रॉम होम’ सुरू असताना त्याने चौदाव्या मजल्यावरुन उडी घेत जीवन संपविले. काय घडलं असं?

Edited byमानसी क्षीरसागर | महाराष्ट्र टाइम्स 4 Mar 2023, 2:40 pm
म. टा. प्रतिनिधी, नाशिक : पुणे शहरातील खासगी कंपनीत कामाला असलेल्या तरुणाने राहत्या घरी ‘वर्क फ्रॉम होम’ सुरू असताना अचानक चौदाव्या मजल्यावरून उडी घेत आत्महत्या केली. या घटनेमुळे आडगाव शिवारात खळबळ उडाली आहे.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम laptop
वर्क फ्रॉम होम सुरु असतांना अचानक तरुणाने चौदाव्या मजल्यावरुन घेतली उडी; काय घडलं असं?


अशी आहे घटना

साहिल बापुराव पवार (२८, रा. रुंग्ठा बेलिसिमो) असे मृत तरुणाचे नाव आहे. त्याच्या आत्महत्येचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. तर, आडगावमध्येच अभियांत्रिकी पदवीच्या विद्यार्थिनीनेही आत्महत्या केली. दरम्यान, दोन्ही घटनांचा काहीही संबंध नसल्याची माहिती आडगाव पोलिसांनी दिली. मुंबई-आग्रा रस्त्यावरील धात्रक फाट्याजवळी मदर तेरेसा आश्रमाजवळ असलेल्या रुंग्ठा बेलिसिमो इमारतीमध्ये पवार कुटुंबीय राहते. अभियांत्रिकीचे शिक्षण पूर्ण करून पुणे शहरात खासगी नोकरी करणारा साहिला हा काही दिवसांपासून ‘वर्क फ्रॉम होम’मुळे नाशिकमध्येच होता. त्याने तणावातून आत्महत्या केल्याची प्राथमिक माहिती आहे. परंतु, त्याचे कारण अद्याप अस्पष्ट असल्याची माहिती आडगाव पोलिसांनी दिली. दरम्यान, मृत साहिल याचे वडिल डॉक्टर आहे. आडगाव पोलिसांनी घटनेप्रकरणी आकस्मात मृत्यूची नोंद केली आहे.

विद्यार्थिनीचा गळफास

आडगाव येथील न्यू इंग्लिश स्कूलशेजारील म्हाडा कॉलनीत २० वर्षीय विद्यार्थिनीने घरात गळफास घेतला. कल्याणी राजाराम फापाळे (२०, मूळ रा. निफाड) असे मृत विद्यार्थिनीचे नाव आहे. आडगाव परिसरातील एका अभियांत्रिकी महाविद्यालयात कल्याणी शिक्षण घेत होती. मध्यरात्री अडीच वाजेच्या सुमारास तिने आत्महत्या केल्याने खळबळ उडाली आहे. तिच्या मित्रमैत्रिणींसह नातेवाइकांशी चर्चा करून आत्महत्येचे कारण शोधण्याचा आडगाव पोलिस तपास करीत आहेत.
लेखकाबद्दल
मानसी क्षीरसागर
मानसी क्षीरसागर, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये सिनीअर डिजीटल कंटेट प्रोड्युसर म्हणून कार्यरत आहेत | डिजीटल पत्रकारितेचा सहा वर्षांचा अनुभव आहे | सामाजिक, राजकीय, मनोरंजन याबरोबरच माहितीविषयक आणि विश्लेषणात्मक बातम्यांचे कव्हरेज करण्याची विशेष आवड... आणखी वाचा

महत्वाचे लेख