अ‍ॅपशहर

मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर भीषण अपघात; एकाचा मृत्यू, ४ जखमी

मुंबई पुणे एक्स्प्रेस वेवर भरधाव कारला झालेल्या भीषण अपघातात एकाचा मृत्यू, तर चौघे गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना तातडीने पनवेलच्या एमजीएम हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. पुण्याहून मुंबईकडे जाणाऱ्या लेनवर खालापूर पोलीस स्टेशनजवळ हा अपघात झाला आहे.

महाराष्ट्र टाइम्स.कॉम 10 Dec 2017, 7:10 pm
कर्जत: मुंबई पुणे एक्स्प्रेस वेवर भरधाव कारला झालेल्या भीषण अपघातात एकाचा मृत्यू, तर चौघे गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना तातडीने पनवेलच्या एमजीएम हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. पुण्याहून मुंबईकडे जाणाऱ्या लेनवर खालापूर पोलीस स्टेशनजवळ हा अपघात झाला.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 1 dead and 4 seriously injured in a fatal accident on mumbai pune express way near karjat
मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर भीषण अपघात; एकाचा मृत्यू, ४ जखमी


या अपघाताबाबत हाती आलेल्या प्राथमिक माहितीनुसार, अपघातग्रस्त कार भरधाव असल्याने चालकाता ताबा सुटला आणि वेग आवरण्याच्या प्रयत्नात कार उलटली. वेग प्रचंड असल्याने कारने तीन ते चार पलटया घेतल्या.

या अपघातात मृत पावलेल्या व्यक्तीचे नाव ज्ञानेश्वर केणे असे आहे.

महामार्ग पोलीस, आयआरबी आणि डेल्टा फोर्सने तातडीने मदत दिल्याने जखमींना योग्य वेळी हॉस्पिटलमध्ये हलवता आले.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज