अ‍ॅपशहर

रायगड किल्ल्यावर पुण्याच्या तरुणाचा मृत्यू

रायगड किल्ल्यावर ट्रेकिंगसाठी आलेल्या पुण्याच्या एका तरुणाचा अपघाती मृत्यू झाल्याची घटना घडली. अजय सिकरवार (वय २८) असे तरुणाचे नाव असून तो मूळचा ग्वाल्हेरचा असून सध्या पुण्यात वास्तव्यास आहे.

Maharashtra Times 26 Jun 2016, 7:35 pm
मटा ऑनलाइन वृत्त। अलिबाग
महाराष्ट्र टाइम्स.कॉम accident on raigad fort
रायगड किल्ल्यावर पुण्याच्या तरुणाचा मृत्यू


रायगड किल्ल्यावर ट्रेकिंगसाठी आलेल्या पुण्याच्या एका तरुणाचा अपघाती मृत्यू झाल्याची घटना घडली. अजय सिकरवार (वय २८) असे तरुणाचे नाव असून तो मूळचा ग्वाल्हेरचा असून सध्या पुण्यात वास्तव्यास आहे.

पुण्यातील दहा ते बारा तरुणांचा गट ट्रेकिंग सराव करण्यासाठी तसेच छत्रपती शिवाजी महाराज यांच्या समाधीचे दर्शन घेण्यासाठी रायगड किल्ल्यावर आले होते. ट्रेकिंग पूर्ण झाल्यानंतर गडावरून पायवाटेने खाली उतरत असताना डोंगरावरून अचानक दरड कोसळली. दरवाजाकडे येत असताना अजयच्या डोक्यात दरडीतील दगड पडल्याने यात तो गंभीर जखमी झाला. दुखापत गंभीर असल्याने त्याचा मृत्यू झाला. या अपघाताची नोंद महाड तालुका पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज