अ‍ॅपशहर

कारागृहातून सुटका होताच तेलतुंबडेंची प्रतिक्रिया, खोट्या गुन्ह्यात डांबून ठेवल्याचा आरोप

प्रा. आनंद तेलतुंबडे यांची तुरुंगातून सुटका करण्यात आली आहे. ३१ महिन्यांनी त्यांची तुरुंगातून सुटका झाली. तळोजा तुरुंगातून सुटका होताच प्रा. तेलतुंबडे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. यात त्यांनी सरकारवर टीक केली आहे.

Authored byम. टा. प्रतिनिधी | महाराष्ट्र टाइम्स 27 Nov 2022, 7:14 am
म. टा. वृत्तसेवा, नवी मुंबई : एल्गार परिषद आणि माओवादी संबंधांबत तळोजा कारागृहात बंदिस्त असलेले प्रा. आनंद तेलतुंबडे यांची शनिवारी दुपारी सुटका झाली. 'सुटका झाल्याने आनंद झाला. मात्र, खोट्या गुन्ह्यात तब्बल ३१ महिने कारागृहात डांबून ठेवल्याचे दु:ख आहे,' अशी प्रतिक्रिया त्यांनी प्रसारमाध्यमांसमोर व्यक्त केली.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम anand teltumbde
कारागृहातून सुटका होताच तेलतुंबडे यांची प्रतिक्रिया, खोट्या गुन्ह्यात डांबून ठेवल्याचा आरोप


माओवादी संबंधांच्या आरोपावरून एप्रिल २०२०मध्ये प्रा. तेलतुंबडे यांना अटक करण्यात आली होती. त्यांचा दहशतवादी कारवायांत सकृतदर्शनी सहभाग स्पष्ट होत नसल्याचे नमूद करून उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती अजय गडकरी आणि न्या. मिलिंद जाधव यांच्या खंडपीठाने तेलतुंबडे यांना जामीन मंजूर केला होता. मात्र, राष्ट्रीय तपास संस्थेने (एनआयए) या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले. उच्च न्यायालयाने मंजूर केलेला जामीन शुक्रवारी सर्वोच्च न्यायालयानेही योग्य ठरवला.

१८४ आरोपींना चार तासांत अटक; ठाणे पोलिसांची व्यापक धडक मोहीम

त्या पार्श्वभूमीवर तेलतुंबडे यांच्या वकिलांनी मुंबईतील विशेष एनआयए न्यायालयात धाव घेऊन कारागृहातील सुटकेचा आदेश काढावा, अशी मागणी केली. तसेच तेलतुंबडे यांच्या जामिनाची हमी म्हणून रोख एक लाख रुपये न्यायालयात जमा केले. विशेष न्यायालयाने ही मागणी मान्य करून तेलतुंबडे यांची तळोजा कारागृहातून सुटका करण्याचे आदेश शुक्रवारी सायंकाळी दिले. शनिवारी हे आदेश तळोजा कारागृह प्रशासनाकडे सादर करण्यात आल्यावर आवश्यक त्या कायदेशीर प्रक्रियेनंतर तेलतुंबडे यांची शनिवारी दुपारी तळोजा कारागृहातून सुटका करण्यात आली. त्यांच्या कुटुंबीयांनी त्यांचे स्वागत केले. या वेळी आमदार कपिल पाटीलदेखील उपस्थित होते.

महिला साडी-सलवारमध्ये छान दिसतात, काही नाही घातलं तरी छान दिसतात : रामदेव बाबा

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज