मुंबईः वारंवार आजारी पडणाऱ्या मुलाला भूतबाधा झाल्याचे सांगून अंगारा-जादूटोण्याद्वारे आजार बरा करण्याचा दावा करत, गरीब कुटुंबाकडून हजारो रुपये उकळणाऱ्या मायलेकाला पवई पोलिसांनी नुकतीच अटक केली. पोलिसांनी घटनास्थळावरून जादूटोणा करण्यासाठी वापरले जाणारे साहित्य हस्तगत केले. पवईत राहणारा एक लहान मुलगा बऱ्याच दिवसांपासून आजारी होता. स्थानिक डॉक्टरांकडे नेऊनही आजार बरा होत नव्हता. याच दरम्यान मुलाच्या तब्येतीच्या काळजीत असलेल्या त्याच्या आईने पवई-तुंगा येथील अरुणोदय सोसायटीमध्ये राहणारी सुमन जाधव आणि तिचा मुलगा अनिल जाधव यांची भेट घेतली. या दोघांनी मुलाला भूतबाधा झाली असल्याचे सांगत काही विधी आणि अंगारा देण्यासाठी दहा हजार रुपये घेतले.
‘जादूटोणा’प्रकरणी अटक
मुंबईः वारंवार आजारी पडणाऱ्या मुलाला भूतबाधा झाल्याचे सांगून अंगारा-जादूटोण्याद्वारे आजार बरा करण्याचा दावा करत, गरीब कुटुंबाकडून हजारो रुपये ...
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 3 Dec 2019, 4:00 am