अ‍ॅपशहर

गणेशमूर्तींमध्ये यंदा ‘बाजीराव’ची बाजी!

अवघ्या महिनाभरावर आलेला गणेशोत्सवासाठी दरवर्षी विविध रुपांतील गणेशमूर्तींना मागणी असतानाच, यंदा लोकप्रियतेत बाजी मारली आहे, ती बाजीराव पेशव्यांच्या गणेशरुपाने! अनेक गणेशभक्त बाजीरावाच्या रुपातील गणेशमूर्तीचा आग्रह धरत आहेत.

Maharashtra Times 30 Jul 2016, 2:56 am
म. टा. वृत्तसेवा, उरण
महाराष्ट्र टाइम्स.कॉम bajirao peshwa ganeshmoorty in demand
गणेशमूर्तींमध्ये यंदा ‘बाजीराव’ची बाजी!


अवघ्या महिनाभरावर आलेला गणेशोत्सवासाठी दरवर्षी विविध रुपांतील गणेशमूर्तींना मागणी असतानाच, यंदा लोकप्रियतेत बाजी मारली आहे, ती बाजीराव पेशव्यांच्या गणेशरुपाने! अनेक गणेशभक्त बाजीरावाच्या रुपातील गणेशमूर्तीचा आग्रह धरत आहेत.

नेहमीच्या धाटणीतील मूर्तीपेक्षा आपला गणपती इतरांपेक्षा वेगळा असावा, या इच्छेमुळे अनेकजण वेगवेगळ्या गणेशमूर्तींची मागणी करत आहेत. त्यासाठी व्हॉट्सअॅपवरून फोटो पाठवून तशीच मूर्ती साकारण्याचा आग्रह करत आहेत. भाविकांच्या मागणीनुसार बाळगणेश, माशावर बसलेला कोळीवेशातील गणपती आदी मूर्ती साकारल्या जात आहेत. यंदा ‘बाजीराव पेशवे’च्या रुपातील गणेशमूर्तीला मागणी असल्याचे उरण तालुक्यातील जासई येथील मूर्तिकार मनोहर पवार यांनी सांगितले.

शाडूच्या मूर्तींना वाढती मागणी

गणेशभक्तांना मूर्तींमध्ये वैविध्य हवे असले तरी पर्यावरणाच्या बाबतीतही ते जागरुक असल्याचे दिसून येत आहे. म्हणूनच प्लास्टर ऑफ पॅरिसऐवजी शाडूच्या मूर्तीची प्रतिष्ठापना करण्याकडे अनेक भक्तांचा कल असल्याचे मूर्तिकारांनी सांगितले.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज