अ‍ॅपशहर

 मारहाण करून लुटले

पनवेल तालुक्यातील दोधानी गाडेश्वर येथून दुचाकीवरून पनवेलच्या दिशेने जाणाऱ्या १६ वर्षीय तरुणाला मोटारसायकलवरून आलेल्या दोघा तरुणांनी बेदम मारहाण करत सोन्याची चेन आणि मोबाइल फोन लुटून नेल्याची घटना सोमवारी सायंकाळच्या सुमारास गाडेश्वर मंदिराजवळ घडली. या प्रकरणी पनवेल तालुका पोलिसांनी दोघा लुटारूंविरोधात जबरी चोरीचा गुन्हा दाखल केला आहे.

Maharashtra Times 28 Sep 2016, 3:00 am
नवी मुंबई: पनवेल तालुक्यातील दोधानी गाडेश्वर येथून दुचाकीवरून पनवेलच्या दिशेने जाणाऱ्या १६ वर्षीय तरुणाला मोटारसायकलवरून आलेल्या दोघा तरुणांनी बेदम मारहाण करत सोन्याची चेन आणि मोबाइल फोन लुटून नेल्याची घटना सोमवारी सायंकाळच्या सुमारास गाडेश्वर मंदिराजवळ घडली. या प्रकरणी पनवेल तालुका पोलिसांनी दोघा लुटारूंविरोधात जबरी चोरीचा गुन्हा दाखल केला आहे.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम bikemen looted youngster in panvel
 मारहाण करून लुटले


विचुंबे गावात राहणारा संकेत गुरव (१६) सोमवारी गाडेश्वर म‌ंदिराजवळ आला असता, मोटारसायकलवरून आलेल्या दोघा लुटारूंनी स्कूटी अडवून त्याची चावी काढून घेतली. त्यातील एका तरुणाने रस्त्याच्या बाजूला पडलेली बाटली उचलून त्याने संकेतला ठार मारण्याची धमकी दिली. तसेच, संकेतला हाता-बुक्क्यांनी बेदम मारहाण करून त्याच्या गळ्यातील सोन्याची चेन आणि त्याचा मोबाइल फोन असा ४० हजार रुपये किमतीचा ऐवज लुटला.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज