नवी मुंबई : नवी मुंबई महापालिकेमार्फत इयत्ता दहावी व दहावी उर्त्तीण झालेल्या विद्यार्थ्यांकरिता भविष्यातील शिक्षणाच्या विविध संधी व करिअरबाबत मार्गदर्शन कार्यशाळेचे नुकतेच सानपाडा येथील सेक्टर १५मधील पामबीच येथील साधु वासवानी इंटरनॅशनल स्कूल येथे आयोजन करण्यात आले होते. यावेळी तज्ज्ञ मार्गदर्शक सुचित्रा सुर्वे यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांना भविष्यातील शिक्षणाच्या विविध संधी व करिअरबाबत येणाऱ्या अडचणी व त्याबाबत घ्यावयाची काळजी याबाबत अतिशय मोलाचे मार्गदर्शन मार्गदर्शकांनी केले. त्यामुळे सर्व विद्यार्थ्यांच्या शंकांचे तात्काळ निराकारण झाले.
करीअर मार्गदर्शन
नवी मुंबई महापालिकेमार्फत इयत्ता दहावी व दहावी उर्त्तीण झालेल्या विद्यार्थ्यांकरिता भविष्यातील शिक्षणाच्या विविध संधी व करिअरबाबत मार्गदर्शन ...
Maharashtra Times 26 Jun 2018, 4:00 am