नागपूर : कोराडीतील प्रतीक्षा बॉइज ओपन सेंटर होममधून १७ वर्षीय चार मुलांनी पलायन केल्याने खळबळ उडाली. ही घटना २२ मार्चला रात्री साडेदहा वाजताच्या सुमारास उघडकीस आली. तेजस, राजू, विशाल व विश्वास ही पलायन केलेल्या मुलांची नावे आहेत. २२ मार्चला रात्री एकापाठोपाठ या चारही मुलांनी सेंटरमधून पलायन केले. २३ मार्चला ही घटना उघडकीस आली. अक्षय जिचकार यांनी कोराडी पोलिस ठाण्यात यासंदर्भात तक्रार दिली. पोलिसांनी अपहरणाचा गुन्हा दाखल करून मुलांचा शोध सुरू केला आहे.
बॉइज सेंटरमधुन मुलांचे पलायन
कोराडीतील प्रतीक्षा बॉइज ओपन सेंटर होममधून १७ वर्षीय चार मुलांनी पलायन केल्याने खळबळ उडाली...
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 25 Mar 2020, 4:00 am