अ‍ॅपशहर

काँग्रेस पनवेल जिल्हाध्यक्षांचा राजीनामा

पनवेलच्या पहिल्या महापालिका निवडणुकीत शेकाप, राष्ट्रवादी काँग्रेससोबत महाआघाडी करून भारतीय राष्ट्रीय काँग्रेसला केवळ दोन जागा मिळाल्या. निवडणुकीतील अपयशाची जबाबदारी स्वीकारून काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आर. सी. घरत यांना पदाचा राजीनामा प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांच्याकडे सोपवला.

Maharashtra Times 29 May 2017, 3:00 am
म. टा. वृत्तसेवा, पनवेल
महाराष्ट्र टाइम्स.कॉम congress panvel district president resigned over defeat in panvel election
काँग्रेस पनवेल जिल्हाध्यक्षांचा राजीनामा

पनवेलच्या पहिल्या महापालिका निवडणुकीत शेकाप, राष्ट्रवादी काँग्रेससोबत महाआघाडी करून भारतीय राष्ट्रीय काँग्रेसला केवळ दोन जागा मिळाल्या. निवडणुकीतील अपयशाची जबाबदारी स्वीकारून काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आर. सी. घरत यांना पदाचा राजीनामा प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांच्याकडे सोपवला.

महापालिका निवडणुकीत काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शेकाप महाआघाडी होती. काँग्रेसच्या वाट्याला १८ जागा आल्या होत्या. मात्र उमेदवार न मिळाल्यामुळे प्रत्यक्षात काँग्रेस १८पैकी १२ जागांवरच उमेदवार उभी करू शकली. उर्वरित जागांवर शेकापने कपबशीच्या चिन्हावर स्वत:चे उमेदवार उभे केले. १२ पैकी काँग्रेसचे केवळ दोन नगरसेवक विजयी झाल्याने काँग्रेसचे मोठे नुकसान झाले आहे. काँग्रेसच्या स्वयंघोषित नेत्यांना स्वत:ला विजय मिळवता आला नाही. ह्या अपयशाचे खापर कार्यकर्त्यांनी जिल्हाध्यक्षांवर फोडण्यापूर्वीच जिल्हाध्यक्ष आर. सी. घरत यांनी पदाचा राजीनामा दिला. अशोक चव्हाण यांच्याकडे राजीनामा सोपवल्याचे त्यांनी ‘मटा’ला सांगितले.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज