नवी मुंबई : सत्याग्रह कॉलेजच्या वतीने संविधान दिनानिमित्त मंगळवारी खारघरमध्ये संविधान रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे. या रॅलीला सकाळी साडेआठ वाजता सुरुवात होणार असल्याची माहिती संस्थेचे प्राचार्य डॉ. जी. के. डोंगरगावकर यांनी दिली. सरकारने यावर्षी सर्व शाळा आणि कॉलेजना २६ नोव्हेंबर ते १४ एप्रिल असे चार महिने संविधान जागृतीसाठीचे कार्यक्रमाचे राबवण्याचे निर्देश दिले आहेत. त्यानुसार सत्याग्रह कॉलेजच्या वतीने २६ नोव्हेंबरपासून पुढील चार महिने अनेक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहेत.
संविधान रॅली
सत्याग्रह कॉलेजच्या वतीने संविधान दिनानिमित्त मंगळवारी खारघरमध्ये संविधान रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे...
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 26 Nov 2019, 4:00 am