अ‍ॅपशहर

अपघातात दोघांचा मृत्यू

कळंबोली येथून पनवेलच्या दिशेने जाणारी भरधाव मोटरसायकल रस्त्याच्या बाजूला प्रवासी घेण्यासाठी उभ्या असलेल्या एसटीवर जोरदार धडकल्याने झालेल्या अपघातात मोटरसायकलवरील दोनही तरुणांचा मृत्यू झाल्याची घटना रविवारी सकाळी सायन-पनवेल मार्गावर कलंबोली येथे घडली.

Maharashtra Times 24 Sep 2017, 11:36 pm
नवी मुंबई : कळंबोली येथून पनवेलच्या दिशेने जाणारी भरधाव मोटरसायकल रस्त्याच्या बाजूला प्रवासी घेण्यासाठी उभ्या असलेल्या एसटीवर जोरदार धडकल्याने झालेल्या अपघातात मोटरसायकलवरील दोनही तरुणांचा मृत्यू झाल्याची घटना रविवारी सकाळी सायन-पनवेल मार्गावर कलंबोली येथे घडली.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम death of two in accident
अपघातात दोघांचा मृत्यू


फरहान नसीम शेख (१८) आणि सचिन उर्फ हर्ष मिश्रा (१७) अशी मृतांची नावे आहेत. जिवलग मित्र असलेले फरहान आणि सचिन रविवारी सकाळी मोटरसायकलवरून कळंबोली येथून सायन-पनवेल मार्गावरून पनवेलच्या दिशेने जाण्यासाठी निघाले. यावेळी फरहानचे मोटरसायकलवरील नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाला.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज