अ‍ॅपशहर

नगरसेवकाला डेंग्यू

तुर्भे येथील १८ वर्षीय ओमकार रंगीलाल यादव यांचा डेंग्यूने मृत्यू झाल्याच्या घटनेला दोन दिवस उलटत नाहीत तोच या आजाराने लोकप्रतिनिधींनाही लक्ष्य केले आहे. बेलापूरच्या आमदार मंदा म्हात्रे यांना डेंग्यूची लागण झाल्यानंतर नवी मुंबई महापालिकेचे नगरसेवक तथा माजी विरोधी पक्षनेते मनोज हळदणकर यांनादेखील डेंग्यूची लागण झाली आहे. त्यांच्यावर उपचार सुरू असलेल्या ऐरोलीतील इंद्रावती रुग्णालयात गेल्या महिनाभरात ३५हून अधिक डेंग्यूचे रुग्ण उपचारार्थ दाखल झाल्याची माहिती तेथील डॉक्टरांनी दिली.

Maharashtra Times 11 Oct 2016, 3:00 am
नवी मुंबई : तुर्भे येथील १८ वर्षीय ओमकार रंगीलाल यादव यांचा डेंग्यूने मृत्यू झाल्याच्या घटनेला दोन दिवस उलटत नाहीत तोच या आजाराने लोकप्रतिनिधींनाही लक्ष्य केले आहे. बेलापूरच्या आमदार मंदा म्हात्रे यांना डेंग्यूची लागण झाल्यानंतर नवी मुंबई महापालिकेचे नगरसेवक तथा माजी विरोधी पक्षनेते मनोज हळदणकर यांनादेखील डेंग्यूची लागण झाली आहे. त्यांच्यावर उपचार सुरू असलेल्या ऐरोलीतील इंद्रावती रुग्णालयात गेल्या महिनाभरात ३५हून अधिक डेंग्यूचे रुग्ण उपचारार्थ दाखल झाल्याची माहिती तेथील डॉक्टरांनी दिली.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम dengue to corporater in navi mumbai
नगरसेवकाला डेंग्यू


महापालिकेचे वाशी येथे एकमेव सार्वजनिक रुग्णालय सुरू असल्याने साथीच्या आजारांनी ग्रस्त असलेल्या रुग्णांना खासगी रुग्णालयात उपचार पर्याय घेण्याशिवाय पर्याय नाही. त्यामुळे शहरातील सर्व खासगी रुग्णालये आण‌ि आयसीयू रुग्णांनी तुडूंब भरली आहेत.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज