अ‍ॅपशहर

रेल्वेमार्गावर खोळंबा

उपनगरीय लोकल मार्गावरील वाहतूक विस्कळीत होण्यास फक्त कारण लागते, याचा अनुभव मंगळवारी पश्चिम, मध्य आणि हार्बर या तिन्ही मार्गांवरील प्रवाशांनी घेतला...

Maharashtra Times 28 Nov 2018, 4:00 am

मुंबई : उपनगरीय लोकल मार्गावरील वाहतूक विस्कळीत होण्यास फक्त कारण लागते, याचा अनुभव मंगळवारी पश्चिम, मध्य आणि हार्बर या तिन्ही मार्गांवरील प्रवाशांनी घेतला. तिन्ही मार्गांवर विविध कारणांमुळे वाहतुकीचा खोळंबा झाला. परिणामी प्रवाशांना दिवस भर गर्दीचा सामना आणि मनस्ताप सहन करावा लागला. ऐन सकाळच्या वेळेस झालेल्या या गोंधळामुळे चाकरमान्यांनी संताप व्यक्त केला. पश्चिम रेल्वे मार्गावरील बोरिवली स्थानकातील क्रॉस ओव्हर पॉइण्टजवळ तांत्रिक बिघाड झाल्याने या मार्गावरील वाहतूक दिवस भर विस्कळीत होती.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज