अ‍ॅपशहर

फडणवीसांचा काँग्रेस, राष्ट्रवादीवर निशाणा; '... तर अडीच लाख मराठा तरुण उद्योजक झाले असते'

Devendra Fadnavis : नवी मुंबईतील माथाडी कामगारांच्या मेळाव्यातून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राष्ट्रवादी आणि काँग्रेसवर हल्लाबोल केला आहे. मराठा समाजाच्या विकासाच्या मुद्द्यावरून फडणवीस यांनी निशाणा साधला आहे.

Authored byटीम मटा ऑनलाइन | Edited byसचिन फुलपगारे | महाराष्ट्र टाइम्स.कॉम 25 Sep 2022, 3:06 pm
नवी मुंबई : वेदांता फॉक्सकॉन हा प्रकल्प राज्याबाहेर गेल्याने शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसकडून राज्यातील शिंदे-फडणवीस सरकारवर जोरदार टीका होत आहे. आता या टीकेला मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून ( Devendra Fadnavis ) प्रत्युत्तर देण्यात येत आहे. आता फडणवीसांनी अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळावरून ( Annasaheb Patil Vikas Mahamandal ) घणाघात केला आहे. अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ जिवंत करून आम्ही मराठा समाजाला न्याय दिला. हेच महामंडळ राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या काळात असेत, तर जवळपास अडीच लाख मराठा तरुण उद्योजक झाले असते, असा दावा करत फडणवीसांनी हल्लाबोल केला.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम devendra fadnavis
फडणवीसांचा काँग्रेस, राष्ट्रवादीवर निशाणा; '... तर अडीच लाख मराठा तरुण उद्योजक झाले असते'


नवी मुंबईत माथाडी कामगारांच्या मेळाव्याला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं भाषण झालं. यावेळी शिंदे आणि फडणवीसांनी माथाडी कामगारांना त्यांच्या समस्या सोडण्याचं आश्वासन दिलं. मुंबईतल्या माथाडी कामगारांच्या घरांसाठी नियमाबाहेर जाऊन आम्ही निर्णय घेतले. आणि राहिलेले प्रश्नही सोडवू, असं आश्वासन फडणवीसांनी दिलं. काँग्रेस, राष्ट्रवादीच्या काळात अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ हे धूळ खात पडून होते. पण आम्ही महामंडळाला संजीवनी देऊन मराठा समाजाला न्याय दिला. माथाडी कामगारांचे नेते नरेंद्र पाटील यांनी जिल्हा, तालुक्यांमध्ये बैठका घेऊन घेतल्या. समाजात जनजागृती केली आणि ५० हजार मराठा तरुणांना उद्योजक होण्याची संधी मिळाली, असं फडणवीस म्हणाले.

Eknath Khadse : खडसे-अमित शहा भेटीवर राष्ट्रवादीची पहिली प्रतिक्रिया, 'हे पवार साहेबांना...'

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे साताऱ्याचे सुपुत्र आहेत. भाजप-शिवसेना सरकारच्या २०१४ ते २०१९ या ५ वर्षांच्या कार्यकाळात मुख्यमंत्री शिंदे यांनी माथाडी कामगारांच्या घरासह इतरही अनेक प्रश्न सोडवले आहेत. आता माथाडी कामगारांच्या घरांसाठी प्रविण दरेकराच्या मुंबई बँकेने २५० कोटी द्यावेत, असं आवाहन फडणवीस यांनी केलं. माथाडी कामगारांच्या नावाने खंडणी घेणाऱ्यांना आणि वसुली सम्राटांना सोडणार नाही, असा इशाराही फडणवीसांनी दिला. आता अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाची जबाबदारी नरेंद्र पाटील यांच्याकडे पुन्हा द्यावी, अशी मागणीही उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी केली.

शिंदे गट विरुद्ध मनसे-भाजप सामना?; ट्विट वॉर रंगले, 'लोढाचे कमिशन, जागांचे व्यवहार...'

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज