अ‍ॅपशहर

ग्रामीण भागात उत्साह

बहुप्रतीक्षित पनवेल महानगरपालिकेच्या स्थापनेनंतर अखेर बुधवारी मतदानाचा दिवस उजाडला. महापालिकेसाठीच्या पहिल्या मतदानासाठी ग्रामीण भागात उत्साहाचे वातावरण पहायला मिळाले. सुट्टीसाठी गावाला गेलेल्या मतदारांनीही मतदानासाठी पनवेल गाठले.

Maharashtra Times 25 May 2017, 3:00 am
पहिल्या दोन तासांतच २५ टक्के मतदान; शहरांत मात्र संमिश्र वातावरण
महाराष्ट्र टाइम्स.कॉम enthusiasm in village area of panvel
ग्रामीण भागात उत्साह


म. टा. वृत्तसेवा, पनवेल

बहुप्रतीक्षित पनवेल महानगरपालिकेच्या स्थापनेनंतर अखेर बुधवारी मतदानाचा दिवस उजाडला. महापालिकेसाठीच्या पहिल्या मतदानासाठी ग्रामीण भागात उत्साहाचे वातावरण पहायला मिळाले. सुट्टीसाठी गावाला गेलेल्या मतदारांनीही मतदानासाठी पनवेल गाठले.

सकाळी साडेसात वाजता मतदानाला सुरुवात झाल्यानंतर ग्रामीण भागात सकाळपासूनच मतदान केंद्रासमोर रांगा लागल्या होत्या. प्रभाग क्रमांक १, २, ३ हा ग्रामीण भागात येतो. येथे पहिल्या दोन तासांतच २५ टक्के मतदान झाले. खारघर सेक्टर ३५सारख्या शहरी भागात मात्र सकाळी १० वाजल्यानंतरही रस्त्यांवर शुकशुकाट होता. कळंबोली, कामोठे वसाहतीत मतदारांचा उत्साह चांगला होता.

महापालिका झाल्यामुळे यापूर्वी जिल्हा परिषद आणि ग्रामपंचायतीसाठी शहरी भागातील नागरिक मतदान करण्यासाठी फारसा उत्साह दाखवत नसत. निवडणुकीत फारसे शहरातील उमेदवार नसल्यामुळे शहरी मतदारांना निवडणुकांत फार रस नसे. महापालिका स्थापनेनंतर शहरातील मतदारही मतदानासाठी उत्सुक दिसत होते. सकाळी ९ वाजता आमदार प्रशांत ठाकूर यांनी मतदान केले.

१० वाजल्यानंतर मतदान करण्यासाठी मतदारांची गर्दी वाढत गेली. उन्हाच्या कडाक्यातही मतदार मतदान करण्यासाठी उत्सुक होते. १ वाजल्यानंतर ही गर्दी कमी होत गेली. मात्र पुन्हा दुपारी ३ वाजल्यानंतर मतदार मतदानासाठी घराबाहेर पडले. तरुण मतदारांची संख्याही लक्षणीय होते.

केंद्रांवर अंधार

चार उमेदवारांना मतदान करण्याची ही पहिलीच वेळ असल्यामुळे अनेकांचा मतदान करण्यासाठी प्रत्यक्षात उभे राहिल्यानंतर गोंधळ उडाला. ग्रामीण भागातील काही मतदान केंद्रांवर अंधार असल्यामुळे मशीनवरील पक्षचिन्हे, उमेदवारांची नावे दिसण्यात अडथळा निर्माण होत होता.

तक्का गावात गोंधळ

प्रभाग क्रमांक २०मधील तक्का गावात शेकापच्या उमेदवार श्वेता बहिरा आणि भाजपचे उमेदवार तेजस कांडपिळे यांच्या पत्नीमध्ये वाद झाला. त्यामुळे काही काळ वातावरण तंग होते. वरिष्ठ पोलिस निरीक्षक सुनिल बाजारे यांनी घटनास्थळी धाव घेऊन परिस्थिती आटोक्यात आणली.

बांदेकरांना पाहण्यासाठी गर्दी

शिवसेना स्वबळावर लढत असल्यामुळे सेनेकडे कार्यकर्त्यांचे बळ असलेले उमेदवार नव्हते. मात्र शिवसेना नेते आदेश बांदेकर यांना पाहण्यासाठी मात्र मतदारांनी गर्दी केली होती. बांदेकर दिवसभर पनवेलमध्ये फिरत असल्यामुळे ते जातील त्या ठिकाणी गर्दी जमा होत होती.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज