नवी मुंबई : तुर्भे येथून बैठक संपवून ऐरोली येथे परतणारे आरपीआयचे नवी मुंबई जिल्हाध्यक्ष सिद्राम ओहोळ यांच्या एसयूव्ही गाडीला भरधाव ट्रेलरने धडक दिल्याची घटना शनिवारी रात्री घडली. या अपघातात सिद्राम ओहोळ आणि त्यांचे पुत्र ठाणे लोकसभा युवा अध्यक्ष यशपाल ओहोळ किरकोळ जखमी झाले आहेत. या अपघातानंतर रबाळे एमआयडीसी पोलिसांनी ट्रेलरचालकाला अटक केली आहे. ठाणे-बेलापूर मार्गावरील भारत बिजली कंपनीसमोरील चौकात पाठीमागून आलेल्या ट्रेलरने ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात ओहोळ यांच्या गाडीला धडक दिली. या अपघातात त्यांच्या गाडीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. रबाळे एमआयडीसी पोलिसांनी ट्रेलरचालकावर गुन्हा दाखल करून त्याला अटक केली आहे.
पितापुत्र अपघातात जखमी
तुर्भे येथून बैठक संपवून ऐरोली येथे परतणारे आरपीआयचे नवी मुंबई जिल्हाध्यक्ष सिद्राम ओहोळ यांच्या एसयूव्ही गाडीला भरधाव ट्रेलरने धडक दिल्याची घटना ...
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 4 Dec 2019, 4:00 am